‘सिमी’वरील बंदी कायम ठेवा

‘सिमी’वरील बंदी कायम ठेवा

पुणे - बंदी घालण्यात आलेल्या सिमी संघटनेच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरूच असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे सिमीवरील बंदी कायम ठेवावी, अशी मागणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शपथपत्राद्वारे सिमीबाबत म्हणणे ऐकून घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकरणासमोर केली.

सिमी संघटनेवरील बंदीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) न्यायाधिकरणाचा दोन दिवस पुण्यात दौरा आहे. पुणे विद्यापीठात झालेल्या सुनावणीत ही मागणी करण्यात आली. न्यायाधीश मुक्ता गुप्ता, अतिरीक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद, विशेष सरकारी समुपदेशक सचिन दत्ता हे या दौऱ्यावर आहेत. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सीआयडी मुंबई शहर विशेष शाखा १चे पोलिस उपअधीक्षक गणेश शिंदे यांनी शपथपत्र दाखल केले. सिमीतर्फे बाजू मांडण्यासाठी कोणी आले नाही. तसेच सामान्य नागरिकांतर्फे कोणीही म्हणणे मांडलेले नाही. 

  इत्तेशाम सिद्दीकी, अब्दुल सुमान ऊर्फ कुरेशी ऊर्फ तौकिर, हरून नाईक, जर्मन बेकरी बाँबस्फोटातील हिमायत बेग या विविध खटल्यांमधील आरोपींचा सिमीशी संबंध असल्याचा दाखला पोलिसांनी दिला. फरासखाना पोलिस स्थानकाजवळ झालेल्या बाँबस्फोटातील पाच आरोपींचा या संघटनेशी संबंध होता. यातील तिघे मध्य प्रदेश येथे तर दोन तेलंगणा येथे मारले गेले. या संघटनेच्या माध्यमातून दहशतवादी कृत्ये करणारे कार्यरत आहेत त्यांच्यावर वचक राहण्यासाठी बंदी ठेवण्यात यावी, अशी मागणी परदेशी यांनी केली. 

सरकार पक्षातर्फे ॲड. राजेश रंजन यांनी बाजू मांडली. न्यायाधिकरणासमोर राज्यात चार शपथपत्रे दाखल करण्यात आली आहेत. फरासखाना बाँबस्फोटासंदर्भातील सुनावणी औरंगाबाद येथे होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com