राजकारण बाजुला ठेवून विकासासाठी प्रयत्न करा

राजकुमार थोरात
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

वालचंदनगर : गावातील नागरिकांनी राजकारण बाजुला ठेवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. शिरसटवाडी (ता.इंदापूर) येथे गावभेटी दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सुळे बोलत होत्या. 

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, माजी सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, शुभम निंबाळकर, रेहना मुलाणी, माधुरी नागाळे, छत्रपतीचे संचालक अभिजित रणवरे, वीरसिंह रणसिंग उपस्थित होते.

गावातील युवकांनी अंर्तगत राजकारणामुळे गावाचा विकास रखडल्याचे सांगितल्यानंतर सुळे यांनी सांगितले की, गावच्या अंर्तगत विकासासाठी युवकांनी, स्थानिक नागरिकांनी राजकारण बाजुला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. सार्वजनिक अडचणींना प्राधान्य देवून त्या मार्गी लावाव्यात. चांगल्या कामासाठी पक्ष नेहमीच पूर्ण ताकदीने युवकांच्या पाठीमागे उभा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  शिवसेनचे अॅड. नितीन कदम यांनी खासदार सुळे यांना भेटून गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले. कार्यक्रमाचे नियोजन हनुमंत मोहिते यांनी केले होते.

Web Title: keep politics aside for village development