स्वतःला अपडेट ठेवायला हवे; रवींद्र कदम यांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

पुणे : ''सध्याचे युग स्पर्धेचे आहे. त्यामुळे महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. बाहेरच्या या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आपल्याला नवे बदल आत्मसात करून स्वतःला 'अपडेट' ठेवायला हवे,'' असा कानमंत्र पुण्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना दिला.

एमआयटी मिटसॉम महाविद्यालयाच्या पदवीप्रदान सोहळ्याप्रसंगी कदम बोलत होते. माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटच अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस, जेट एअरवेजचे उपाध्यक्ष गिल्बर्ट जॉर्ज, आयआयएम इंदौरच्या डॉ. मधुश्री श्रीवास्तव, नॅशनल डिफेन्स ऍकॅडमीचे बटालियन कमांडर कॅप्टन देवांशू रस्तोगी आदी उपस्थित होते. 

प्रा. डॉ. कराड म्हणाले, ''स्वामी विवेकानंद यांनी भाकीत केल्याप्रमाणे एकविसावे शतक हे भारताचे शतक असेल. 21व्या शतकात भारत हा जगात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. त्यासाठी प्रयत्न करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.'' 

नेतृत्वगुणांचा विकास करून समाजापुढे आदर्श ठेवायला हवा. लीडरशिप करण्यासाठी कॅरॅक्‍टर, कम्पॅशन, कमिटमेंट आणि करेज ऑफ कन्व्हीक्‍शन असे पाच 'सी' महत्त्वपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी उत्साही, तत्पर असायला हवे, असे मत कॅप्टन रस्तोगी यांनी मांडले. 

नवीन तंत्रज्ञान आणि गॅजेट्‌स यात तरुणाई जास्त गुंतलेली दिसत आहे. याऐवजी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करायला हवा. प्रश्न आणि आव्हानांना सामोरे जावे. प्रश्नाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या संधी कमी करू नका, असा सल्ला डॉ. श्रीवास्तव यांनी दिला. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.

Web Title: Keep yourself updated says Pune Police Joint commissioner Ravindra Kadam