वाढदिवसाचा खर्च टाळून केरळमधील पूरग्रस्तांना मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे - कोणी एक दिवसाचा पगार, तर कोणी महिनाभराचे मानधन, शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी जमा केलेली रक्कम, तसेच वाढदिवसाचा खर्च टाळून त्यात आणखी भर घालून दिलेली रक्कम, अशा प्रकारे केरळच्या पूरग्रस्तांना मदतीसाठी नागरिक समोर येत आहेत. ‘सकाळ रिलीफ फंड’मार्फत केरळवासीयांसाठी मदत करणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. 

पुणे - कोणी एक दिवसाचा पगार, तर कोणी महिनाभराचे मानधन, शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी जमा केलेली रक्कम, तसेच वाढदिवसाचा खर्च टाळून त्यात आणखी भर घालून दिलेली रक्कम, अशा प्रकारे केरळच्या पूरग्रस्तांना मदतीसाठी नागरिक समोर येत आहेत. ‘सकाळ रिलीफ फंड’मार्फत केरळवासीयांसाठी मदत करणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. 

कुटुंबातील एखादी व्यक्ती जाणे हा त्या कुटुंबावरचा मोठा आघात असतो, पण अशा वेळीही सामाजिक जाणिवेचे भान ठेवत अंत्यविधीचा खर्च टाळून ही रक्कम ‘सकाळ रिलीफ फंड’कडे देणारे कुटुंबही समोर आली आहेत. कोंढवा बुद्रुक येथील महापालिकेच्या १७४ बी क्रमांकाच्या मुलांनी फिरून निधी गोळा करून ही रक्कम फंडकडे सोपविली आहे. 

यांनी केली मदत - रु. १०१ - राजेंद्र नारायण शिंदे, रु. २०० - कर्वे फॅमिली, रु. २५१ - बाळासाहेब पंढरीनाथ हिंगणे, रु. ४५० - मुक्ता विनेश नागरे, रु. ५०० - साक्षी महेश गोपाळे, स्नेहल आणि सागर पी. प्रजापती, ज्ञानेश्‍वर धोंडिबा टेकवडे, वीणा ज्ञानेश्‍वर टेकवडे, मनीष अशोक मुनोत, स्वरूपा एरंडे, प्रवीणभाई शाह, तेजा धुमावत, दिनेश शाह, बंडोपंत पानसे, अरुण गुजराती, सोनाली अनिल कात्रे (ईएमओ), रामभाऊ एरंडे, डॉ. विश्वास डाके, राजेंद्र वायदंडे, ५०१ - मनीष उदय जगदाळे, १००० - रामलर चेतन रामचंद्र, हरीश पुखराज शर्मा, सुधा राजाराम आंबेकर, सुद्राम कृष्णाजी विश्वे, अजय भालेराव, १००१ - रवींद्र रघुनाथ पाषाणकर, मुक्तांजली रघुनाथ पाषाणकर, १०११ - पी. पी. जोशी, राधेश्‍याम आणि पुष्पा चौधरी, २००० - वैजयंती वर्तक, ऊर्वी यशोधन मिठारे, हेमंत एम. शिंदे, श्‍याम भास्कर अवधूतकर, बिमान अरुण करमरकर, नेहा दिलीप गांधी, २१०० - युनिकॉर्न टेक्‍नोवर्ल्ड, २५०० - शीतल मुकुंद करवा, ३००० - व्ही. ए. देशवंडीकर, ४००० - देऊरकर कुटुंबीय, मनपा शाळा क्र.१४७ मुले, ५००० - प्रभाकर वासुदेव देव, कांतिलाल जैनुभाऊ शिवाले, फरांदे काळूराम मारुती, परदेशी शांता महाराजदीन (नाव प्रकाशित करू नका), मनीषा मनोहर पुरोहित, जीवन यशवंत महाजन, डॉ. पंडित संभाजीराव चव्हाण, विलास चाफेकर, संजय गोपाळ दळवी, ५५०० - छाया हरिदास भट्टड, हरिदास माणिकलाल भट्टड, ६००० - सुरेश मुद्रंकित , १०००० - स्मिता श्रीकांत काळे, जयहिंद इलेक्‍ट्रिकल्स (नाव प्रकाशित करू नका), १२००० - पालेकर श्रीपाद डी., २०००० - बोर्ले प्रभाकर आर., मालती धोत्रे, २१००० - एस. व्ही. चाफळकर ॲण्ड कंपनी, २५००० - तुषार आत्माराम कलाटे, विजया माधवराव कुलकर्णी, ५१००० - कन्हैया रघुनाथ अग्रवाल

प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक रुपया
युवा अस्मिता संस्थेने प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एक रुपया जमा करून तब्बल १३ हजार ८८५ रुपयांची मदत सकाळ रिलीफ फंडाकडे जमा केली. युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Web Title: Keral Flood help Sakal Relief Fund