मातृभूमीआधी कर्मभूमीला मदत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी केरळीय समाज बांधवांकडून 'सकाळ रिलीफ फंडा'स दीड लाखांची मदत

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी- जयमालानगर येथील श्री अय्यप्पा स्वामी सेवा परिषद मंदिर समितीने सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'कडे दीड लाखाचा धनादेश दिला. 

पिंपरी- चिंचवड शहरात गेल्या 50 वर्षांपासून नोकरी व काम-धंद्यानिमित्त विविध राज्य, प्रांतांतून मोठा वर्ग येऊन वास्तव्यास राहिला आहे, त्यापैकीच केरळी समाज मोठ्या प्रमाणावर शहरातील विविध उपनगरांत वास्तव्यास आहे.

जुनी सांगवी- जयमालानगर येथे मुळा नदीकिनारा परिसरात श्री अय्यप्पा स्वामी मंदिर असून परिसरातील भाविक, धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येथे एकत्रित येतात. केरळ मातृभूमीतही सध्या पूर परिस्थिती असताना सांगली, कोल्हापूर येथे झालेल्या आपत्तीस प्रथम प्राधान्य देऊन 'आधी कर्मभूमी मग मातृभूमी' असे म्हणत येथील श्री अय्यप्पा स्वामी सेवा परिषद मंदिर समितीने सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी "सकाळ रिलीफ फंडा'कडे दीड लाखाचा धनादेश दिला. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kerala community helps to sangali, kolhapur floods victims