#kerala flood : पुणे महापालिकेकडून केरळला एक कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणे - केरळला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदतीत दुपट्टीने वाढ, प्रसूतीसाठी महिलांना तातडीने मदतीसाठी दोन रग्णावाहिका, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

केरळला आर्थिक मदत
केरळ मधील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी पुणे महापालिकेच्या नगरसेवकांच्या या वर्षीच्या अंदाजपत्रकातील वॉर्डस्तरीय निधीतून एक लाख रुपये मदत द्यावी, या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. 

शहरी गरीब योजनेची मर्यादा दुप्पट
शहरी गरीब वैद्यकीय सहाय योजनेअंतर्गत पॅनेलवरील खासगी रुग्णालयात अंतर्गत विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी एक लाखाची मर्यादा रक्कम दोन लाखांपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

गर्भवतींसाठी विशेष रुग्णवाहिका
प्रसूतीसाठी महिलांना तातडीने रुग्णालयात पोचता यावे, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात दोन रुग्णवाहिका घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या रग्णवाहिकांमध्ये प्रसूतितज्ज्ञासह गर्भवतींना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध अशा पद्धतीच्या सुविधा असणार  आहेत. महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले आणि नगरसेविका वृषाली चौधरी यांनी हा प्रस्ताव दिला होता, असे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

भामा आसखेड योजनेसाठी निधीची तरतूद
पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड योजनेअंतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च म्हणून रुपये सुमारे १६२ कोटी रुपये आणि त्यावरील विलंब शुल्क म्हणून १२ टक्के व्याजाने २०१३ पासून भरण्यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकापासून टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. पूर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. 

Web Title: kerala flood One crore rupees from Pune Municipal Corporation