Kerala Floods : कुटुंब प्रलयात; तरीही तो हसवतोय...

Kerala Floods : कुटुंब प्रलयात; तरीही तो हसवतोय...

बारामती - सर्कसमध्ये जोकर म्हणून काम करताना तो विंगेत उभा राहतोच मुळी, एकदम हसरा चेहरा घेऊन. काही क्षणांत चित्रविचित्र उड्या, विनोदातून तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो; परंतु विंगेच्या बाहेर आला, की त्याच्या या हसऱ्या चेहऱ्यावरच्या मुखवट्यामागे गावाकडचे, लेकीच्या वेदनांचे दुःख चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. बारामतीतील रेम्बो सर्कसमधील बिजू नायर ही दुहेरी भूमिका वठवताना साऱ्या प्रेक्षकांकडून दुवा घेताहेत, ती देवभूमीतील प्रलयात सापडलेल्या कुटुंबांच्या स्वास्थासाठी.

येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयानजीक रॅम्बो सर्कस सध्या सुरू आहे. या सर्कशीमध्ये नायर हे विदूषकाची भूमिका वठवत आहेत. ते केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील परभूर गावचे आहेत. त्यांच्या पत्नीचे १२ वर्षांपूर्वीच निधन झाल्याने त्यांची मुले सासूबाईंकडे असतात. ते गाव नदीकिनाऱ्याला लागून आहे, त्यामुळे गावाला पुराचा फटका बसला. पाऊस खूप पडतोय हे नायर यांना माहिती होते. मात्र, सर्कस सुरू झाल्यानंतर तिथे आपल्यावाचून बरेच काही अडेल याची खात्री असल्याने देवाच्या भरवशावर ते येथेच थांबले. त्यात १५ ऑगस्ट रोजी जेव्हा त्यांना सासरचे घरच पाण्यात पूर्ण बुडाल्याचे समजले, तेव्हा मात्र धक्का बसला. त्यांनी मच्छीमार मित्रांशी संपर्क साधला, तेव्हा १८ वर्षांची मुलगी शिनी हिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजले. सासूबाईंना दम्याचा आजार आहे, मात्र लष्कराने त्यांना वाचवून सुरक्षितस्थळी नेल्याचे समजल्याने ते अस्वस्थ आहेत. अजूनही पाऊस सुरूच आहे. 

३२ वर्षे विदूषकाची भूमिका
सारे आयुष्य अशाच समस्यांनी घेरलेले आहे, त्यामुळे ‘घेतले हे व्रत’ या उक्तीप्रमाणे सुरू झालेले काम मध्येच सोडता येत नाही, कारण ३२ वर्षे विदूषकाची भूमिका करतोय, त्याला न्याय मिळायलाच हवा अशी त्यांची स्थिती असून, चेहऱ्यावरचे दुःख विदूषकाच्या ‘मेकअप’खाली दडवून ते लोकांना हसवतात आणि हळूच येऊन मोबाईलमध्ये पुढे काय घडलंय याची माहिती बिजू नायर घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com