kerala floods: आंबेगावातील डॉक्‍टरांचे पथक केरळमध्ये

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मंचर : भारतीय जनता पक्ष डॉक्‍टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. तारांचद कराळे (सातगाव पठार, ता. आंबेगाव) यांच्यासह वीस डॉक्‍टर, वीस सेवक व वीस परिचारिकांचे पथक केरळ येथील पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी काम करत आहेत. आतापर्यंत एक हजार 250 पूरग्रस्तांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले आहेत. दहा लाख रुपये किमतीची औषधे सोबत नेली आहेत. गेले चार दिवस दोन छावण्यांतील एक हजार लोकांना दोन वेळेचे जेवण देण्याची व्यवस्थाही डॉ. कराळे यांनी केली आहे.

डॉ. कराळे यांचे मावळ तालुक्‍यात सोमाटणे फाट्यावर पायनेर हॉस्पिटल आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्या सूचनेनुसार गुरुवारी (ता. 23) वैद्यकीय पथक केरळ राज्यात गेले आहे.

डॉ. कराळे म्हणाले, "तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरल्यानंतर 150 किलोमीटरचा प्रवास केला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गावे निश्‍चित केली. थिरुवदुंर, पानंद, कुटोर, माझुकिर, मुथावजय, चेंगिन्नुर व परिसरातील गावांमध्ये पुराचे पाणी व त्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे थंडी, ताप, सर्दी, खोकला आदी आजारांची लागण झालेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले. नगरसेवक पांडुरंग वहिले, श्रीकृष्ण देशमुख व नवनाथ बोडके हे आमच्या बरोबर आहेत. सोबत औषधांचा साठा आहे. भाजपचा डॉक्‍टर सेल व पायनेर हॉस्पिटलने अर्थसाह्य व औषधे उपलब्ध करून दिली आहेत. अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यामुळे तेथील नागरिकांनी आम्हाला धन्यवाद दिले.''

Web Title: kerala floods: Ambegaon doctors team at Kerala