Loksabha 2019 : 10 कोटी रोजगार निर्मितीचे काय झाले ?  : केशवचंद्र यादव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

पुणे : ''मोदी सरकार दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार होते. मात्र नोटाबंदी आणि GST मुळे 4 कोटी 70 लाखाने रोजगार घटला. त्यामुळे 10 कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले?'',असा सवाल काँग्रेस युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्र यादव यांनी गुरुवारी उपस्थित केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसच्या युवक संघटनानी एकत्र येत 14 संघटना मिळून युनायटेड युथ फ्रंटची स्थापना केली आहे. एस. एम. जोशी सभागृहात फ्रंटचा मेळावा आयोजित कऱण्यात आला होता. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत यादव यांना हा प्रश्न उपस्थित केला. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील यावेळी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keshavchandra Yadav questioned about 10 Core's Job opportunity