मांजा न वापरण्याची चिमुकल्यांकडून शपथ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

केशवनगर - पतंग उडविणे हा जरी आनंद देणारा खेळ असला तरी यात वापरण्यात येणाऱ्या चिनी मांजामुळे निष्पाप लोकांचा, प्राण्यांचा व पक्ष्यांचा नाहक बळी जात आहे. ‘सकाळ’च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचाही यात नाहक बळी गेला. त्यामुळे अशा प्रकारचा घातक मांजा आम्ही वापरणार नाही, अशी शपथ सारथी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात ‘मांजा नको’ची पतंगाकृती साकारत मुजुमदार यांना श्रद्धांजली वाहिली.

प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मधुरा चौधरी म्हणाल्या, ‘‘काही दिवसांपूर्वी मांजामुळे निरपराध महिलेचा बळी गेला. एकीकडे मुलांचा खेळ होतो. दुसरीकडे एखाद्याच्या आयुष्याची राखरांगोळी होते. यासाठी मानवी साखळीतून पतंग, मांजाची प्रतिकृती दाखवून घातक मांजा वापरू नये, याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन या उपक्रमाद्वारे करण्यात आले. असा मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी,’’ अशी मागणीही त्यांनी केली. 

‘‘विद्यार्थ्यांची संवेदनशीलता याच वयात जागृत करता येते. त्यामुळे माणुसकीची भावना जपण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन केले जाते,’’ असे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शुभांगी माने यांनी सांगितले या वेळी सारथी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश जगताप उपस्थित होते. सुनीता जाधव व संतराम इंदुरे यांनी नियोजन केले.

Web Title: keshavnagar news manja kite oath