‘केजी टू पीजी’ शिक्षण मोफत व्हावे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - ‘‘उच्च शिक्षण महागडे झाल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. ‘केजी टू पीजी’ शिक्षण परवडणाऱ्या शुल्कात किंवा मोफत होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘‘उच्च शिक्षण महागडे झाल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. ‘केजी टू पीजी’ शिक्षण परवडणाऱ्या शुल्कात किंवा मोफत होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांना युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिकेची ‘डी. लिट’ ही पदवी नुकतीच मिळाल्याने प्राचार्य भाऊसाहेब जाधव मित्रमंडळ गौरव समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी देशमुख बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. सोनावणे, रंजना जाधव, मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजी गणगे, पुणे विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्ष नंदकुमार निकम, निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्‍याम देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी डॉ. निगवेकर म्हणाले, ‘‘देशात आजही कोट्यावधी बालके शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’’ या वेळी जाधव यांनी सत्काराला उत्तर दिले. तर डॉ. सोनावणे, चौधरी, गणगे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शेणई यांनी केले.

शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्‍नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे, अशा परिस्थिती गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण परवडणार कसे, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहत आहे. 
- लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

Web Title: KG to PG education free laxmikant deshmukh