पुण्याचे सव्वा वर्षाचे पाणी सोडले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

खडकवासला - खडकवासला प्रकल्पातून आजअखेर सुमारे 19 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून सोडलेला हा पाणीसाठा शहराला सव्वा वर्ष पुरेल इतका आहे. 

खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासलाच्या पाणलोट क्षेत्रात 60 दिवस पाऊस सुरू आहे. त्यातही सुमारे 40 दिवसांपासून सलग संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहर व परिसरातील लाखो रहिवाशांना तब्बल सव्वा वर्ष पुरेल एवढे 19 टीएमसी पाणी धरणातून सोडले. हे पाणी उजनी धरण तसेच हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्‍यांतील शेतीला सोडले आहे. 

पानशेत, वरसगावच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे हे धरणात जमा झाले. तेथून ते खडकवासला धरणात जमा झाले. तेथून मुठा नदीमार्गे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या उजनी धरणात जमा झाले आहे. 

खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर म्हणाले, ""सलग संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून 17 जुलैपासून जादा झालेले पाणी मुठा नदीत व मुठा उजव्या कालव्यातून सोडत आहे. आजअखेर सुमारे 19 टीएमसी पाणी सोडले आहे, त्यातील 14 टीएमसी पाणी उजनी धरणात, तर साडेचार टीएमसी पाणी शेतीला सोडले आहे. 

खडकवासलातून 15 हजार 129 क्‍युसेक वेगाने पाणी मुठा नदीत व 1355 क्‍युसेक वेगाने पाणी मुठा कालव्यातून शेतीला सोडले जात आहे. गुरुवारी दिवसभरात टेमघर येथे 28, पानशेत येथे 8, वरसगाव येथे 9 व खडकवासला येथे 2 मिलिमीटर इतका पाऊस पडला. पानशेत धरणातून अंबी नदीत 3908 व वीजनिर्मितीसाठी 620 क्‍युसेक, वरसगावमधून मोसे नदीत 6077 व टेमघर धरणातून मुठा नदीत 788 क्‍युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. धरण साखळीत आज 27.78 टीएमसी म्हणजे 95.31 टक्के इतका पाणीसाठा आहे. 

गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणी सोडले 
खडकवासला धरणातून गेल्या वर्षी 10 टीएमसी जादा पाणी सोडले होते, तर यंदा 19 टीएमसी पाणी सोडले. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट पाणी सोडले. चार धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. त्याची तुलना केली तर 19 टीएमसी म्हणजे चारही धरणांत मिळून 65 टक्के पाणीसाठा जमा होतो.

Web Title: Khadakvasla dam water released next one year