खडकवासला धरण साखळीत 22 टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

खडकवासला : मागील पाच दिवसापासून पावसाची धार कमी जास्त होत असली तरी धरणात पाणी जमा होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने शनिवारी सकाळी धरणात 6.39 टीएमसी पाणी साठले असून धरण साखळीत सुमारे 22 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

शुक्रवारी सकाळी 5.52 टीएमसी पाणी साठा होता तो शनिवार सकाळी 6.39 टीएमसी झाला. शहरासाठी 0.050 टीएमसी सोडण्यात आले. असे धरून ही वाढ 0.920 टीएमसी एवढी म्हणजे सुमारे एक टीएमसी आहे.

या महिन्यात 2 जुलै रोजी धरणाची नीचांकी पातळी 3.54 टीएमसी होती. त्यानंतर आज पाच दिवसांनी 2.850 टीएमसी व शहरात पिण्यासाठी सोडलेले धरून ही वाढ 3.200टीएमसी एवढी आहे.

Web Title: Khadakvasla dams water stock

टॅग्स