खडकवासला - तीन कोटी रुपयांची दुरुस्ती केली असल्याचा पाटबंधारे विभागाचा दावा 

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

खडकवासला - दांडेकर पूल परिसरातील कालवा फुटल्यानंतर कालव्याची दुरुस्तीला पैसे नाहीत. कालव्यातून १२ महिने पाणी सुरू असल्याने दुरुस्तीला वेळ नाही. अशा गोष्टी समोर आल्या. या घटनेनंतर  30 किलोमीटर परिसरात पालिका हद्दीत खडकवासला पाटबंधारे विभागाने लहान- मोठ्या सुमारे 15 ठिकाणी भराव मजबुतीकरणाची सुमारे तीन कोटी रुपयांची दुरुस्ती केली असल्याचा दावा केला आहे. 

खडकवासला - दांडेकर पूल परिसरातील कालवा फुटल्यानंतर कालव्याची दुरुस्तीला पैसे नाहीत. कालव्यातून १२ महिने पाणी सुरू असल्याने दुरुस्तीला वेळ नाही. अशा गोष्टी समोर आल्या. या घटनेनंतर  30 किलोमीटर परिसरात पालिका हद्दीत खडकवासला पाटबंधारे विभागाने लहान- मोठ्या सुमारे 15 ठिकाणी भराव मजबुतीकरणाची सुमारे तीन कोटी रुपयांची दुरुस्ती केली असल्याचा दावा केला आहे. 

जनता वसाहत परिसरातील कालवावरील रस्ता खचल्याची माहिती दिल्यानंतर पालिकेने ती दुरुस्ती केली. आणि दांडेकर पूल परिसरातील भराव खकल्याच्या कामात मदत केली आहे. अन्य कोणत्या दुरुस्तीला किंवा अन्य कामाला मदत केलेली नाही. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. 

पालिकेने बिलाची रक्कम दिली नसल्याने दुरुस्ती रखडलेली आहे. तरी देखीलपाटबंधारे विभागाने त्यांच्या पातळीवर यंत्रसामुग्री विभाग आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून शिंदे वस्ती ससाने नगर डायस प्लॉट स्वारगेट फुरसुंगी या ठिकाणी दुरुस्ती केलेली आहे.
कालव्यावरील भराव दुरुस्तीची सुमारे 15 ते 16 ठिकाणी भराव मजबुतीकरणाचे काम करण्यात आलेले आहे. ससाने नगर येथील वेताळबाबा झोपडपट्टी परिसर जलसेतू धोकादायक झाला होता. या ठिकाणी बाहेरील बाजूस व आतील बाजूने भराव माती नव्हता या ठिकाणी एक मीटर मध्ये तीन फुटाचा भराव राहिला होता. या ठिकाणी मुरूम मातीचा केल्या मुळे या ठिकाणच्या भरावाची रुंदी ही चार मीटर 12 फुट पर्यंत झालेली आहे. भराव केला त्या ठिकाणी सुमारे दीडशेहून अधिक ट्रक मातीचा भराव टाकण्यात आलेला आहे 

याचबरोबर, जलसेतू फूरसुंगी परिसरातील जलसेतू गळती होती किरकोळ दुरुस्त्या होत्या. त्यात इंदापूर परिसरातील असणाऱ्या ठिकाणी काम करण्यात आले आहे तर परिसरातील पाटबंधारे विभागाच्या मुठा विभाग, खडकवासला, हडपसर, लोणी काळभोर यवत पाटस इंदापूर येथील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर यांत्रिकी विभागाचे असे दोन्ही मिळून शेती अडीशे अधिकारी कर्मचारी काम करत होते. याचबरोबर जेसीबी पोकलेन डंपर यांची मदत घेण्यात आली अशा प्रकारे या सर्वांचा खर्च ही रक्कम सुमारे तीन कोटी पेक्षा जास्त होत आहे. असा दावा शेलार यांनी केला आहे. 

पालिकेने पैसे न दिल्याने दुरुस्ती रखडली
पुणे महापालिकेने वापरलेल्या पाण्याचे बिल सुमारे दोनशे कोटी रुपये असून त्यातील 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली होती. परंतु त्यातील अद्याप ती रक्कम मिळाले नाही. ती रक्कम मिळाली नसल्याने या कालव्याच्या कालव्याची दुरुस्ती करता आलेली नाही. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. 

पाटबंधारे विभागाच्या पालिकेकडून अपेक्षा काय आहेत 
- पाटबंधारे विभागाच्या कालवा किंवा भराव परिसरात टाकला जाणारा कचरा महापालिकेने उचलावा 
- पाटबंधारे विभागाच्या हद्दीलगत असलेल्या अतिक्रमण काढण्यास मदत करावी
- कालवाच्या लगतच्या आतील बाहेरील बाजूच्या संरक्षण भिंतीचे दुरुस्ती पालिकेने करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakvasla - The irrigation department has claimed to have repaired three crores of rupees