खडकवासला प्रकल्पात 97 टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

खडकवासला - वरसगाव धरणात आज संध्याकाळी 100 टक्के पाणीसाठा जमा झाला. त्याचबरोबर चारही धरणांतील पाणीसाठा 28.27 टीएमसी म्हणजे 97 टक्के झाला आहे.

मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात अत्यल्प प्रमाणात वाढ होत आहे. वरसगाव धरणात आज दिवसभर 350 दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला. त्यातील 50 दशलक्ष घनफूट पाणी वीजनिर्मितीसाठी सोडले आहे. 300 दशलक्ष घनफूट पाणी जमा होत आहे. त्यामुळे, उद्या वरसगाव धरणातून पावसाचा अंदाज घेऊन मोसे नदीत पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. 

टेमघर धरणामधून 275, पानशेतमधून वीजनिर्मितीसाठी 623 क्‍युसेक तर आंबी नदीतून 1698, वरसगाव धरणातून 570 क्‍युसेक पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी खडकवासला धरणात जमा होत असल्याने दिवसभर 4165 क्‍युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत होते.

टेमघर खोऱ्यात पाऊस
धरण क्षेत्रातील पाऊस सध्या थांबला आहे. पानशेत व वरसगाव खोऱ्यात दिवसभर फक्त आठ मिलिमीटर पाऊस झाला, तर खडकवासला धरण साखळीत अवघा तीन मिमी पाऊस पडला. परंतु, त्यापेक्षा टेमघर धरणाच्या पाणलोटात 32 मिमी पाऊस पडला आहे.
 
धरणांतील पाणीसाठा...
गुरुवारी संध्याकाळी पाच वाजताची स्थिती
टेमघर - 3.26/88.05
वरसगाव - 10.40/97.65
पानशेत - 12.82/100.00
खडकवासला - 1.78/90.39
चारही धरणांतील पाणीसाठा 28.27 टीएमसी 96.97 टक्के

Web Title: khadakwasala 97% Water storage full