दोन वर्षांत सहाव्यांदा चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

भिगवण - खडकवासला कालव्यावरील छत्तीस चारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून व जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार मागील दोन वर्षांमध्ये सहावेळा चारीच्या कामाची चौकशी करण्यात आली. जलसंपदा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता पी. डी. आडे यांनी नुकतीच कामाची चौकशी केली. या चौकशीतून तरी न्याय मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे.

इंदापूर व बारामती तालुक्‍यांतील अनेक गावांतील शेती सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या छत्तीस चारीचे काम मागील दोन वर्षांपासून चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. सिद्धेश्वर निंबोडी येथील संतोष सोनवणे व शेतकऱ्यांनी छत्तीस चारीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार केली होती. तक्रारीनुसार यापूर्वी कामाची वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून पाच वेळा चौकशी झाली आहे. परंतु, चौकशीबाबत तक्रारदार शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यामुळे पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी होती. जलसंपदा विभागाचे पुणे विभाग मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी सहाव्यांदा चारीच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले. मुंडे यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता पी. डी. आडे यांनी छत्तीस चारीच्या कामाची पाहणी केली.

आरे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कामाची चौकशी केली आहे. याबाबतचा अहवाल जलसंपदा विभागाकडे सुपूर्द करणार असल्याचे आडे यांनी सांगितले.  

इंदापूर तालुक्‍यातील मदनवाडी व बारामती तालुक्‍यांतील पारवडी परिसरासाठी जीवनदायिनी असलेल्या छत्तीस चारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार येथील शेतकऱ्यांनी जुलै २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या विविध समित्यांनी आत्तापर्यंत पाच वेळा या कामाची चौकशी केली आहे. मागील चौकशांमधून काही निष्पन्न न झाल्यामुळे आता सहाव्यांदा चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. 

छत्तीस चारीचे कामाबाबत पाचवेळा चौकशी झाली आहे. त्यामधून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. या समितीकडून तरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. 
- संतोष सोनवणे, तक्रारदार

Web Title: khadakwasala canal work