महात्मा गांधीजींच्या आठवणीत रमले खडकवासला ग्रामस्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधीजींच्या आठवणीत रमले, खडकवासला ग्रामस्थ

महात्मा गांधीजींच्या आठवणीत रमले खडकवासला ग्रामस्थ

खडकवासला : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महात्मा गांधी सरदार वल्लभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर यांच्या खडकवासला भेटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाची पूर्तता यानिमित्त स्मरण महात्म्यांचे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री भैरवनाथ विठ्ठल मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला होता. गांधीजींच्या कार्यक्रमाचे या घटनेचे साक्षीदार असलेल्या नागरिकांनी सांगितलेल्या आठवणीत सर्वजण रमले होते.

हेही वाचा: CMO आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा कोरोनाचा शिरकाव!

मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमी असल्याने कार्यक्रम घेतला नाही. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम झाला. गांधीजींच्या कार्यक्रमाचे साक्षीदार असलेल्या खडकवासला, किरकटवाडी, गोऱ्हे बुद्रुक, कोपरे गावातील नागरिकांचा सत्कार यावेळी केला. चरख्यावर कातलेल्या सुताचे दोऱ्यांचा हार, लाकडी चरखा, शाल- श्रीफळ मान्यवरांच्या हस्ते केला. सत्कारार्थीचे वय 79 ते 98 पर्यंत आहे. या घटनेच्या संदर्भात त्यांच्या मुलाखतीची चित्रफीत इतिहास अभ्यासक डॉ.नंदकिशोर मते यांनी तयार केली आहे. यावेळी ती दाखविली.

हेही वाचा: 'हा हिंदू धर्म आहे का?'; खुर्शीद यांच्या घरावर हल्ला, केली जाळपोळ

गांधी भेटीचे प्रत्यक्ष साक्षीदार

महात्मा गांधीजींच्या खडकवासला भेटीच्या अनेक आठवणी ज्ञानेश्वर विष्णू मते, बायजाबाई धोंडीबा मोरे, धोंडीबा दशरथ सोनवणे, साधू सखाराम मते, सोपान लक्ष्मण मते, केशव हनुमंत करंजावणे, महादू हरी मते, जगन्नाथ धोंडीबा मते, रामचंद्र मारुती मते, अर्जुन जनाजी कोल्हे, ज्ञानेश्वर गणपत खिरीड, जगन्‍नाथ रामचंद्र मते, दिगंबर बाबुराव मते, निवृत्ती हरी मते, रामभाऊ रायकर, विठ्ठल तुकाराम बोडके, जीवन सोपान मते यांनी सांगितल्या.

नामफलकाचे पूजन

खडकवासल्यात 1942 ते 4५ साली रोटरी क्लबचे ग्रामीण सुधारणा केंद्राच्या माध्यमातून दवाखाना सुरू होता. तो पाहण्याकरता गांधीजी गावात आले होते. त्या काळी चलेजाव चळवळीच्या देशात मोठा उठाव सुरु होता. त्यावेळी गांधीजी आले होते. आज ग्रामपंचायतीच्या चौकात महात्मा गांधीजी येथे आले होते. असा नाम फलक लावला जाणार आहे त्याचे पूजन आमदार भीमराव तापकीर, जिल्हा परिषदेच्या सभापती पूजा पारगे, काका चव्हाण, सचिन मोरे, राहुल घुले पाटील यांनी केले.

श्रीभैरवनाथ विठ्ठल मंदिरात कार्यक्रम झाला. यावेळी फुले विद्यापिठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस एड. अभय छाजेड राज देशमुख, आबा जगताप, रोटरी क्लबचे रोटरी क्लब ऑफ पुना अध्यक्ष निवृत्त कर्नल भरत हलाडी, मैथिली मनकवाड, एनपीएस बक्षी, माजी सरपंच गोकुळ करंजावणे, माजी उपसरपंच सुशांत खिरीड, बाजीराव पारगे, गावातील यशवंत विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी सिंहगड व कमिन्स कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर मते यांनी केले. तर आभार राहुल मते यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन श्रीभैरवनाथ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे पराग मते, विलास मते, अशोक मते, मुरलिधर मते, सुनील मते, जिल्हा परिषद सदस्य विलास मते, अवधूत मते, विजय कोल्हे, संदीप मते, आनंद मते, गणेश मते, अनिल मते, पोलिस पाटील ऋषीकेश मते, विजय मते, महादेव मते, सुरेश मते, महेश मते, अतुल मते, नीलेश मते, संदीप मते, रामदास मते, अजय मते ,सोपान मते, दिलीप मते, शेखर मते, जीवन कोल्हे, साहेबराव मते, जीवन मते, शिवाजी मते, लक्ष्मणराव रायकर, अविनाश तिकोने यांनी केले होते.

हेही वाचा: मशरूमच्या वापराने कोरोना बरा होणार? अमेरिकेत संशोधन

'सकाळ’मुळे गावाची मोठी माहिती मिळाली

"गांधीजी गावात आल्याची माहिती आम्हाला होती परंतु त्या बाबत अधिकृत माहिती कुठे उपलब्ध होत नव्हती. आम्ही ‘सकाळ’च्या ग्रंथालयात आम्हाला 1945 सालच्या सकाळ मध्ये गांधीजी आले होत्या त्या कार्यक्रमाची बातमी सापडली. त्याबातमीतून खूप मोठी माहिती मिळाली. या बातमीच्याआमचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यास सकाळच्या बातमीचा आम्हाला मोठा उपयोग झाला. त्या बातमीचा मोठी फ्रेम तुळशीदास मते यांनी ट्रस्टला दिली."

-डॉ.नंदकिशोर मते, इतिहास अभ्यासक

loading image
go to top