खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

खडकवासला - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंददेखील काही उत्साही पर्यटक घेत आहेत. प्रत्यक्षात पोहण्याची परवानगी पाटबंधारे विभागाची नाही. तरीदेखील नागरिक येथे पोहताना दिसत आहेत.

धरण परिसरातील चौपाटी हे पुणेकरांचे बारामाही पर्यटन ठिकाण झाले आहे. उन्हाळा, पावसाळ्यात गर्दी होते. ही चौपाटी सकाळी नऊपासून रात्री नऊपर्यंत सुरू असते.

दरम्यान, पूर्वी वाहनेदेखील धुण्यासाठी नागरिक धरणात घेऊन जात होते. अनेक जणांचा धरणात पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. अनेक जणांनी येथे येऊन आत्महत्यादेखील केल्या आहेत. हे पाणी पुण्यासाठी पिण्यासाठी असल्याने या पाण्याची सुरक्षितता म्हणून या सर्व गोष्टींना बंधन घालण्यासाठी धरणाकडेला भिंत घालण्याचे नियोजन होते.

त्यानुसार तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. 2009- 2010मध्ये पुणे महापालिकेने खडकवासला धरणाच्या चौपाटी परिसरात पाण्याच्या बाजूला भिंत बांधण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केला आहे. उर्वरित चौपाटी करण्याचे काम रखडले आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने मुले या धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी येत आहेत. तसेच, पर्यटकही येथे येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही उत्साही पर्यटक व नागरिक या धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्याची परवानगी मात्र पाटबंधारे विभागाने दिलेली नाही. त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे.

Web Title: khadakwasala dam tourism