पावसाचा जोर मंदावला अन्‌ विसर्ग कमी केला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर सोमवारी कमी झाला, त्यामुळे धरणातील 18 हजार क्‍युसेकचा विसर्ग चार हजार 280 पर्यंत कमी केला आहे.

सोमवारी सकाळी सहापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे 2, पानशेत येथे 12, वरसगाव 14 व टेमघर येथे 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी रात्री व सोमवारी पाऊस कमी होत गेला.

खडकवासला - धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर सोमवारी कमी झाला, त्यामुळे धरणातील 18 हजार क्‍युसेकचा विसर्ग चार हजार 280 पर्यंत कमी केला आहे.

सोमवारी सकाळी सहापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे 2, पानशेत येथे 12, वरसगाव 14 व टेमघर येथे 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी रात्री व सोमवारी पाऊस कमी होत गेला.

खडकवासला धरणातील विसर्ग सकाळी सहा वाजता 13 हजार 981 क्‍युसेक होता, तो नऊ वाजता नऊ हजार 416 क्‍युसेक, 11 वाजता चार हजार 280 क्‍युसेकपर्यंत कमी केला. परंतु, चारही धरणांच्या पाणलोटात दुपारी चारनंतर पावसाच्या सरी पडल्या. खडकवासला, पानशेत व वरसगाव ही तिन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. टेमघरमध्ये 98.99 टक्के पाणीसाठा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasala Dam Water Release Less by Rain Decrease