खडकवासला धरणातून १८ हजार क्‍युसेक विसर्ग

Khadakwasala-Dam-Water
Khadakwasala-Dam-Water

खडकवासला - खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून १३ हजार ९८१ क्‍युसेकने पाणी सोडले जात होते. रविवारी चार वाजता विसर्ग १८ हजार ४९१ क्‍युसेक केला.

पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी पहाटे सहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे ७, पानशेत येथे २८, वरसगाव ३० व टेमघर येथे ४० मिलिमीटर पाऊस पडला आहे. खडकवासला, पानशेत व वरसगाव ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. टेमघर धरणात ३.५६ टीएमसी म्हणजे ९५.९५ टक्के साठा शिल्लक आहे. चारही धरणांत २९ टीएमसी पाणी जमा आहे. दरम्यान, दोन सप्टेंबरपासून खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली. सात दिवसांत ६.३५ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. तसेच, १० जुलैपासून कालव्यात सुमारे ५.२५ टीएमसी पाणी सोडले. म्हणजे, एक आवर्तन पूर्ण झाले असून, दुसरे आवर्तन सुरू आहे. आतापर्यंत खडकवासला धरणातून ४०.७८ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com