खडकवासला धरणातून 14 हजार क्‍युसेक विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

खडकवासला - गेल्या तीन- चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांतील विसर्ग सोडण्यात आल्याने खडकवासला धरणातील विसर्ग 2568 क्‍युसेकवरून 14,000 क्‍युसेकपर्यंत वाढविला आहे.

खडकवासला - गेल्या तीन- चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांतील विसर्ग सोडण्यात आल्याने खडकवासला धरणातील विसर्ग 2568 क्‍युसेकवरून 14,000 क्‍युसेकपर्यंत वाढविला आहे.

पानशेत धरणातून 2944 पासून 5408 क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. वीजनिर्मितीसाठी 620 क्‍युसेक सोडले जात आहे. वरसगाव धरणातून 1777 क्‍युसेक पाणी मोसे नदीत सोडण्यात आले. टेमघर धरणातील विसर्ग 774 क्‍युसेक आहे. पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांच्या पाण्यामुळे खडकवासला धरणात 10 हजार 356 क्‍युसेक पाणी जमा होत आहे. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता चारही धरणांत मिळून 27.61 टीएमसी म्हणजे 94.73 टक्के पाणी जमा झाले आहे. यामुळे शिवणे- नांदेड, डेक्कन येथील भिडे पूल पाण्याखाली गेले आहेत.

वरसगाव 100 टक्के भरले
वरसगाव धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते, त्यामुळे हे धरण पूर्ण रिकामे केल्याने या धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आज या धरणात उपयुक्त साठा सुमारे 12.82 टीएमसी म्हणजे 100 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Web Title: Khadakwasala Dam water released rain