खडकवासला धरण साखळीत पन्नास टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणांत मिळून 14.85 टीएमसी (50.93 टक्के) पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला किमान 10 महिने पुरेल एवढा आहे; तर शेतीसाठीची तीन आवर्तने पूर्ण होतील.

खडकवासला - धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणांत मिळून 14.85 टीएमसी (50.93 टक्के) पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला किमान 10 महिने पुरेल एवढा आहे; तर शेतीसाठीची तीन आवर्तने पूर्ण होतील.

दरम्यान, आज रविवारी दिवसभरात खडकवासला येथे अवघा एक मिलिमीटर पाऊस पडला; तर पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात मात्र पाऊसच पडलेला नाही. मागील वर्षीपेक्षा आठ टीएमसी म्हणजे 27 टक्के पाणीसाठा कमी आहे.

खडकवासला धरणात 77, पानशेतमध्ये 56, वरसगाव 45; तर टेमघर येथे 40 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasala Dam Water Storage