सिंहगड घाट रस्त्याची तज्ज्ञांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

आठवडाभरात अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार

खडकवासला - सिंहगड घाटात दरडी कोसळून अपघात होऊन नये म्हणून सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना करता येतील, याबाबतची पाहणी मुंबई येथील ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनी केली असून, याबाबत आठ दिवसांत अहवाल त्यांच्याकडून मिळेल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

आठवडाभरात अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार

खडकवासला - सिंहगड घाटात दरडी कोसळून अपघात होऊन नये म्हणून सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना करता येतील, याबाबतची पाहणी मुंबई येथील ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनी केली असून, याबाबत आठ दिवसांत अहवाल त्यांच्याकडून मिळेल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

आयआयटी मुंबई येथील भूगर्भशास्त्र विषयातील तज्ज्ञ टी. एन. सिंग यांनी व त्यांचे दोन सहायकांनी ही पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रभाकर काकडे या वेळी उपस्थित होते. त्यांनी छायाचित्रे काढली असून, माती व दगडाचे नमुने घेतले आहेत. विविध ठिकाणी वेगवेगळे दगड आढळले आहेत. त्याची चाचणी करून त्या ठिकाणी दरडींसदर्भात काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अहवाल त्यांच्याकडून मिळाल्यानंतर त्या कामाचे अंदाजपत्रक करावे लागणार आहे. तो अहवाल व अंदाजपत्रक राज्य सरकारला सादर करुन त्यांच्याकडून यावर निधी मंजूर होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिली.  

माती असलेली छोट्या टेकड्या, ठिसूळ दगड, मुरमाड, दगड, खडक, असे विविध प्रकार घाटातील डोंगरात आहेत. खाली मुरमाड व त्यावर खडक असा एकत्र परिसरदेखील आहे. घाटातील विविध ठिकाणी डोंगर, खडकाची उंची वेगवेगळी आहे. त्यानुसार जाळ्यांची उंची कमी जास्त असणार आहे. नऊ किलोमीटरचा घाट रस्ता आहे. यातील अति धोकादायक ठिकाणी प्राथमिक त्यानंतर धोकादायक व कमी धोकादायक तीन टप्पे केले जाणार आहेत. त्यानुसार, त्या कामांना प्राधान्य दिले जाईल. 

मोठी दरड पडल्याच्या घटना 
सिंहगड घाट रस्त्याची जिल्हा नियोजन विकास निधीमधून दुरुस्ती २०१२ केल्यानंतर अकरा हजार पाइंटजवळील दरड २०१३ मध्ये पडली होती. २०१४ मध्ये माळीणची दुर्घटना घडली. त्याच वेळी घाटात मोठी दरड पडली होती. तसेच या वर्षी नुकतेच १५ जुलै व ३१ जुलै रोजी दरड पडल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. परंतु २५ जून २०१७ रोजी घाटात कुमार विजय शिंदे (रा. उंड्री) यांच्या छातीवर दगड पडल्याने ते जखमी झाले होते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी घाट रस्त्यात दरड प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची गरज आहे.

उपाययोजना काय असतील?
मोठ्या कठीण खडकाला जाळ्या बसविणे (एक्‍स्प्रेस वे प्रमाणे), सिमेंट काँक्रीटचा मारा करणे (वारजे डुक्कर खिंडीप्रमाणे), खडकातील, डोंगरातील पाणी पाइपने बाहेर काढणे, यासह विविध उपाययोजना सुचविल्या जाण्याची अपेक्षा आहे.

Web Title: khadakwasala news sinhgad watching by technician