दोन दिवसांपासून धरणात पाऊस नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

खडकवासला - पुणे शहर आणि परिसरात सोमवारी मॉन्सून दाखल झाला. मात्र, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी धरण क्षेत्रात पावसाने कोठेही हजेरी लावली नाही. खडकवासला येथे बुधवारी संध्याकाळी अवघा एक मिलिमीटर पाऊस पडला.

खडकवासला - पुणे शहर आणि परिसरात सोमवारी मॉन्सून दाखल झाला. मात्र, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी धरण क्षेत्रात पावसाने कोठेही हजेरी लावली नाही. खडकवासला येथे बुधवारी संध्याकाळी अवघा एक मिलिमीटर पाऊस पडला.

दरम्यान, बुधवारी सकाळी चारही धरणांत 3.30 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पावसाच्या हलक्‍या सरीही पडल्या नाहीत. आज दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण होते. एक जूनपासून बुधवारी रात्री दहा वाजेपर्यंत खडकवासला येथे 15, पानशेत येथे 66, वरसगाव येथे 69 व टेमघर येथे 53 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

Web Title: khadakwasala pune news no rain in dam