खडकवासलाचे पाणी इंदापुरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

कळस - खडकवासला कालव्याचे उन्हाळ्यातील दुसरे व या वर्षांतील सहावे आवर्तन इंदापूर तालुक्‍यात पोचले. कालव्याची निर्मिती झाल्यापासून प्रथमच उन्हाळ्यात तालुक्‍याला दोन आवर्तने देणे शक्‍य झाले आहे. पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवून या आवर्तनातून यवत, पाटस, दौंड व इंदापूर उपविभागांतर्गत असलेल्या लाभक्षेत्राला शेतीसिंचनासाठी सुमारे अडीच टीएमसी पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. 

शेलार म्हणाले, ‘‘पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव ठेवत शेतीसिंचनासाठी सुमारे अडीच टीएमसी पाणी उपलब्ध आहे. यातून प्रत्येक विभागानुसार समप्रमाणात पाणी वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचावे, पाण्याची मागणी केलेल्या लाभधारक शेतकऱ्याला पाणी मिळावे, यासाठी इंदापूर तालुक्‍यातील पाण्याचे वितरण आपण स्वतः उपस्थित राहून करणार आहोत. अनधिकृतपणे बेकायदेशीर पाणीचोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

यामध्ये आमच्या कर्मचाऱ्याचा संबंध आढळला तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. गत आवर्तनावेळी आम्ही तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या वेळीही पाणीचोरीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेची व वीज वितरण कंपनीची मदत घेतली जाणार आहे.’’

 आवर्तन शेती सिंचनासाठी असल्याने यातून तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार नाही. शिवाय पावसाचे दिवस तोंडावर आल्याने, शेतकऱ्यांनीही काटकसरीने पाणी वापरण्याचे नियोजन करावे. प्रत्येक लाभधारक पाणी मागणी केलेल्या शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन शेलार यांनी केले आहे.

Web Title: khadakwasala water in indapur