पुणे: खडकवासला परिसरात जाळले चार ट्रक

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 16 मार्च 2017

हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत आहेत. त्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज पाहून गुन्हा दाखल केला जाणार आहे. मते यांचे ट्रक जाळण्यामागे नक्की कारण काय याबाबत चौकशी केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले.

पुणे - पुणे शहरात वाहने जाळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता दुचाकीनंतर चारचाकींना लक्ष्य करण्यात आले आहे. खडकवासला येथे बुधवारी मध्यरात्री चक्क चार ट्रक जाळण्याची घटना घडली आहे.

खडकवासला गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटीलबुवा मते यांचे चार ट्रक आहेत. मते यांची सिमेंट विक्रीची एजन्सी आहे. आगीत जीवित हानी झालेली नसली तरी चारही ट्रक पूर्ण जाळून खाक झाल्याने सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे मते यांनी सांगितले. आग लागली त्यावेळी मते यांच्या घरातील सर्वजण झोपले होते. आग लागल्यानंतर आवाजामुळे ते जागे झाले. त्यांनी मग आग्निशमन व पोलिसांना माहिती दिली.

सिंहगड रस्त्यावरील अग्निशामकदलास माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतू चार ट्रक त्यातील डिझेलमुळे आगीचे लोट मोठे होते. ट्रक रोज दुसऱ्या जागेवर उभे करीत होते. परंतु शिवजयंतीचा दोन दिवस कार्यक्रम असल्याने नेहमीच्या जागेऐवजी बंगल्याच्या शेजारी 40-50 फुटांवर ते उभे केले होते. रात्री अडीच ते पाउणेतीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जण आले. त्यांनी ते ट्रक जाळले. असे मते यांनी सांगितले. 

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सिमेंट ने-आण करण्यासाठी ट्रकचा वापर केला जातो. हे ट्रक 12 व 14 चाकी होते एक ट्रक ध्ये सिमेंटची पोती भरलेली होती. त्याच्यावरील ताडपत्री जळाली. हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत आहेत. त्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज पाहून गुन्हा दाखल केला जाणार आहे. मते यांचे ट्रक जाळण्यामागे नक्की कारण काय याबाबत चौकशी केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Khadakwasla area burned four trucks