खडकवासला 100 टक्के भरले; मुठा नदीत सोडले पाणी

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 11 जुलै 2019

खडकवासला धरणातील बुधवारी संध्याकाळी पाच धरणातील येवा 500 क्यूसेक पेक्षा जास्त असल्याने कालव्यातून 500 क्यूसेक पाणी सोडले. मध्यरात्री दोन वाजता 1300क्यूसेक येवा होता. धरणाच्या कालव्यातून 500 आणि मुठा नदीत 856 पाणी सोडून धरणाची पातळी कायम राखण्याचा प्रयत्न केला.

पुणे : खडकवासला धरणच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण आज (गुरुवारी) पहाटे 100 टक्के भरल्याने धरणातून 850 क्यूसेक मुठा नदीत सोडले. येवा वाढल्याने सकाळी विसर्ग सहा वाजता 1712 तर नऊ वाजता 2568क्युसेक्स करण्यात आला आहे. तर कालव्याचा विसर्ग दहा वाजता हजार क्यूसेक पर्यंत वाढविला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. 

खडकवासला धरणातील बुधवारी संध्याकाळी पाच धरणातील येवा 500 क्यूसेक पेक्षा जास्त असल्याने कालव्यातून 500 क्यूसेक पाणी सोडले. मध्यरात्री दोन वाजता 1300क्यूसेक येवा होता. धरणाच्या कालव्यातून 500 आणि मुठा नदीत 856 पाणी सोडून धरणाची पातळी कायम राखण्याचा प्रयत्न केला.

गुरुवारी सकाळी सहा वाजता धरणातील येवा 2200 क्युसेक्स पर्यंत वाढला म्हणून कालव्यातील विसर्ग 500 ठेवून नदीत 1712 क्यूसेक केला. दरम्यान,आठ वाजण्याच्या सुमारास तीन हजार 200 क्यूसेकपर्यंत येवा होता. नऊ वाजता नदीतील विसर्ग 2568 क्यूसेक तर काळव्यातून 700 क्यूसेक पाणी सोडले. तर दहा वाजता 1000 क्यूसेक करण्यात आला. पाऊस सुरू असल्याने आज पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यामुळे पाऊस वाढल्यानंतर येईल तेवढे पाणी मुठा नदीत सोडले जाणार आहे. असे खडकवासला धरणाचे शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasla dam full water release on Mutha river