खडकवासला : प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांसह पाचजण पॉझिटिव्ह | Corona Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

First Aid Center

खडकवासला : प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांसह पाचजण पॉझिटिव्ह

किरकटवाडी : खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर पाच आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील रुग्णसंख्याही वाढत असून ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा 80 च्या पुढे गेल्याने नागरिकांनी गर्दी टाळून व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ वंदना गवळी यांनी केले आहे. (Khadakwasla First Aid Center Corona Updates)

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 15 कर्मचारी आहेत. यापैकी एक सहाय्यक आरोग्य अधिकारी, तीन सिस्टर,एक लॅब टेक्निशियन व एक डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या लसिकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच कोरोना तपासणीसाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यातच आरोग्य केंद्रातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण निर्माण होताना दिसत आहे.

सकाळी साडेनऊ पासून सुरू होते तपासणी

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील नऱ्हे, नांदेड,किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी-सणसनगर व गोऱ्हे बुद्रुक या गावांतील नागरिकांसाठी आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी सुरू आहे.वाढता संसर्ग लक्षात घेता दैनंदिन तपासण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून ज्या नागरिकांना लक्षणे आहेत त्यांना सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत तपासणी करून घ्यावी असे आवाहनही डॉ गवळी यांनी केले आहे.

गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या जास्त

सध्या ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णांपैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे गृह विलगीकरणावर भर देण्यात येत असून आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात येत आहेत. ज्या रुग्णांना तीव्र लक्षणे जाणवत आहेत त्यांना पुणे महापालिकेचे लायगुडे रुग्णालय किंवा ससून रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे डॉ गवळी यांनी सांगितले.

"कर्मचारी पॉझिटिव्ह आले असले तरी उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे लसीकरण, तपासणी व औषधोपचार ही कामे सुरळीत सुरू आहेत. नागरिकांनीही गर्दी टाळून व प्रतिबंधात्मक नियम पाळून सहकार्य करणे गरजेचे आहे." डॉ. वंदना गवळी, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsCorona updates
loading image
go to top