खडकवासला धरणातून साडेतीन हजार क्यूसेक पाणी सोडले

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 16 जुलै 2018

खडकवासला - खडकवासला धरणात सोमवारी सकाळी सहा वाजता 100 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने सकाळी आठ वाजता मुठा नदीत 2000 क्यूसेक पाणी सोडले आहे. त्यानंतर दहा वाजता 3424 क्यूसेक पाणी सोडले आहे.

खडकवासला - खडकवासला धरणात सोमवारी सकाळी सहा वाजता 100 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने सकाळी आठ वाजता मुठा नदीत 2000 क्यूसेक पाणी सोडले आहे. त्यानंतर दहा वाजता 3424 क्यूसेक पाणी सोडले आहे.

दरम्यान, सकाळी पाउणे सात वाजता कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर, तांत्रिक सहायक डी एम. भागवत यांनी मुठा नदीचे पूजन करण्यात आले. 

पानशेत, वरसगाव, टेमघर धरणाचा परिसरात रविवारी रात्री जास्त पाऊस झाला. खडकवासला धरणात सकाळी 4000 तासाला दोन हजार क्यूसेकचा येवा आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदीतून 3424 क्यूसेक व कालव्यात 400 क्यूसेक पाणी सोडण्यात आले.

याच पद्धतीने येवा राहिल्यास उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत खडकवासला धरण 100 टक्के भरेल. खडकवासला धरण परिसरापेक्षा पानशेत, वरसगाव, टेमघर धरणाचा परिसरात जास्त पाऊस आहे. या तीन धरणाच्या भिंतीच्यानंतर पडलेल्या पावसाचे पाणी थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.

कालव्याच्या विसर्ग रात्री आठ वाजता 400 क्यूसेक करण्यात आला. कालव्यात पाणी सोडल्याने आता येवा नियंत्रण केला जात आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता 1000 क्यूसेक करण्यात येणार आहे.

वर्षभराचा पाणीसाठा
सोमवारी सकाळी सहा वाजता चार धरणात मिळून 17.42 टीएमसी म्हणजे 60 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी पुणे शहराला वर्षभर पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे. तर हे पाणी शेतीसाठी द्यायचे असल्यास चार रोटेशन पूर्ण होतील. एवढे पाणी जमा झाले आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर यांनी सांगितले. 

24 तासात वाढले 2 टीएमसीची वाढ
चार धरणात मिळून रविवारी सकाळी 15.47 टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. तो सोमवारी सकाळी 17.42 टीएमसी झाला याचा अर्थ 24 तासात 2 टीएमसीने वाढ झाली असल्यासाचे उपअभियंता रघुनाथ व्यवहारे यांनी सांगितले. 

पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवू 
दरम्यान, पावसाचा जोर सोमवारी सकाळी येवा कायम होता. ३५०० क्यूसेक पर्यंत पाणी नदीत सोडण्यात येत होते. येईल. येवा वाढल्यास उद्या सकाळी नदीत पाणी सोडण्याचे प्रमाण वाढू शकते. पानशेत धरणात 73 वरसगाव येथे 46 व टेमघर धरणात 47  टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 
-पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे  विभाग 

Web Title: Khadakwasla left three thousand cusecs of water from the dam