तोडफोडीनंतर खडकवासला सेल्फी पॉईंट पुन्हा उभा

खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खडकवासला धरण चौपाटीवर 'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता.
Aapal Khadakwasala
Aapal KhadakwasalaSakal

किरकटवाडी - 15 जून रोजी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच तोडफोड (Damage) करण्यात आलेला 'आपलं खडकवासला' (Aapal Khadakwasala) हा खडकवासला धरण चौपाटीवरील सेल्फी पॉईंट (Selfie Point) पुन्हा नव्याने उभारण्यात आला आहे. सरपंच सौरभ मते यांनी स्वखर्चाने सदर सेल्फी पॉईंट उभा केला आहे. (Khadakwasla Selfie Point Re Erected After Demolition)

खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खडकवासला धरण चौपाटीवर 'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. यासाठी ग्रामपंचायीने एक ते दीड लाखांचा खर्च केला होता. काम पुर्ण झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दि. 15 जून रोजी सदर सेल्फी पॉईंट चे उद्घाटन झाले होते. आकर्षक विद्युत रोषणाई आणि त्यामागे दिसणारा खडकवासला धरणाचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र काही समाजकंटकांनी विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवत त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास या सेल्फी पॉईंटची तोडफोड केली होती.

Aapal Khadakwasala
पुणे : चालकांच्या विरोधामुळे ई कारचा विषय बारगळला

सेल्फी पॉईंटच्या तोडफोडीनंतर खडकवासल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सौरभ मते यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांची भेट घेऊन सुत्रधाला अटक करण्याची मागणी केली. हवेली पोलीसांनी प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत खडकवासला गावातील दोन तरुणांना तोडफोड प्रकरणी अटक केली.

दरम्यानच्या काळात खडकवासला गावचा पुणे महानगरपालिका हद्दीत समावेश झाला. ग्रामपंचायतीचे अधिकार संपुष्टात आले. त्यामुळे सरपंच सौरभ मते यांनी स्वखर्चाने सेल्फी पॉईंटची दुरुस्ती केली आहे. सध्या खडकवासला धरण भरल्याने सेल्फी पॉईंट पासून अप्रतिम दृश्य दिसत आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी खडकवासला धरण परिसरात संचारबंदीचे आदेश दिल्याने पर्यटक व नागरिकांना या ठिकाणी येऊन सेल्फी काढण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com