खंडाळ्यात दरडी पाडण्याचे काम सुरू

बोरघाट, खंडाळा - बोगद्यावरील धोकादायक दरडी पाडण्याचे काम सुरू असल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.
बोरघाट, खंडाळा - बोगद्यावरील धोकादायक दरडी पाडण्याचे काम सुरू असल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यानजीक धोकादायक दरडी पाडण्याच्या कामास रस्ते विकास महामंडळाकडून मंगळवारी (ता. १२) पुन्हा सुरवात केली आहे. यादरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. १२ ते २० मार्च या कालावधीत खंडाळा बोगद्यानजीक हे काम सुरू राहणार आहे. 

मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास खंडाळा बोगद्याच्या वरील भागात सुटे झालेले दगड, तसेच दरडी पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक खंडाळा एक्‍झिट येथे, तर पुण्याकडे येणारी वाहतूक दस्तुरी, अंडा पॉइंटजवळ पंधरा मिनिटांसाठी थांबविण्यात आली होती.

टप्प्याटप्प्यात हे काम हाती घेण्यात येत असल्याने वाहतूक पंधरा मिनिटे थांबविल्याने वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला आहे. काही वर्षांपूर्वी द्रुतगती मार्गावर कोसळलेल्या दरडींच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या वतीने खंडाळा बोगद्याजवळ धोकादायक दरडींवर जाळ्या टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सुट्ट्या झालेल्या दरडींचा धोका असल्याने त्या पाडण्यात येत आहे. कामांमुळे या कालावधीत द्रुतगतीवरील खंडाळा घाटात वाहतूक काही काळ विस्कळित होण्याची शक्‍यता असल्याने प्रवासी व वाहनचालकांनी सुरक्षित प्रवासासाठी दक्षता घेत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

रस्ता बंद ठेवण्यात येणाऱ्या वेळा
खंडाळा घाटात वीस मार्चपर्यंत द्रुतगतीवरील वाहतूक सकाळी दहा ते सव्वादहा, अकरा ते सव्वाअकरा, बारा ते सव्वाबारा, दोन ते सव्वादोन, तीन ते सव्वातीन या कालावधीत दरडीच्या कामासाठी टप्प्याटप्यात थांबविण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com