माळवाडीत आढळला दुर्मीळ खापरखवल्या साप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

पर्यावरणाचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेपामुळे दुर्मीळ होत चाललेल्या खापरखवल्या सापास येथील सर्पमित्रांनी जीवदान दिले. माळवाडीतील रहिवासी संकेत बनसोडे यांनी आपल्या अंगणात वेगळ्या प्रकारचा साप आढळला. त्यांनी त्याबाबतची माहिती तळेगावातील वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य नयन कदम, निनाद काकडे, मयूर दाभाडे, कुणाल खैरनार यांना दिली.

तळेगाव स्टेशन - पर्यावरणाचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेपामुळे दुर्मीळ होत चाललेल्या खापरखवल्या सापास येथील सर्पमित्रांनी जीवदान दिले. माळवाडीतील रहिवासी संकेत बनसोडे यांनी आपल्या अंगणात वेगळ्या प्रकारचा साप आढळला. त्यांनी त्याबाबतची माहिती तळेगावातील वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य नयन कदम, निनाद काकडे, मयूर दाभाडे, कुणाल खैरनार यांना दिली.

करड्या पिवळ्या रंगाचा, जाड मात्र अखूड असा हा दुर्मीळ खापरखवल्या प्रजातीचा साप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पश्‍चिम घाटाच्या परिसरात आढळणारा हा साप बिनविषारी आहे. या बाबत चमूने वनविभागास माहिती देऊन त्याला निसर्गात सोडून देण्यात आले. अमाप वृक्षतोड आणि निसर्गाच्या ऱ्हासामुळे सापांच्या अनेक प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khaparkhavalya Snake in malwadi