पुण्यात कॉल सेंटरमधील तरुणीवर बलात्कार; आरोपीस अटक

kharadi call center girl case one arrested
kharadi call center girl case one arrested

पुणे : कॉल सेंटरमधील शिफ्ट संपल्यानंतर पहाटे घरी परतणाऱ्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास तरुणास विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. नगर रस्ता परिसरातील सीसीटीव्हीमध्ये त्याच्या दुचाकीचा क्रमांक आढळून आल्यानंतर त्यावरून माग काढून या आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या. त्यास न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अमोल धनवे (वय 24, रा. खराडी) यास अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत 20 वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.  पीडित तरुणी ही खराडीतील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत असून, ती धानोरी परिसरात रहायला आहे. 31 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास काम संपवून घरी जात होती. त्यावेळी टिंगरेनगर परिसरात तिला आरोपी धनवे याने अडविले. मारहाण करून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तिला खराडी परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला येरवड्यातील गुंजन चौक येथे आणून सोडून दिले. पीडित तरुणीने याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्ह्याचा तत्काळ तपास सुरू करत येरवडा, नगर रस्ता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली. त्यामध्ये धनवे एका ठिकाणी एटीएममधून पैसे काढत असल्याचे दिसून आले, तसेच त्यात त्याच्या दुचाकीचा नंबर ही पोलिसांना मिळाला. त्यानुसार शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावरून आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आरोपीचे हिंजवडी आणि खराडी भागात मोबाईलचे दुकान आहे.
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com