खरिपासाठी ७९९ कोटींचे पीककर्ज

Loan-Distribution
Loan-Distribution

जिल्हा बॅंकेतर्फे ९९ हजार शेतकऱ्यांना लाभ; यंदा मागणी दुपटीने वाढली
पुणे - जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्जाची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आतापर्यंत ९९ हजार ५२२ शेतकऱ्यांना ७९९ कोटी १७ लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४७.०५ टक्के आहे.

गतवर्षी सद्यःस्थितीत ६८ हजार ३५० शेतकऱ्यांनी मिळून ५४७ कोटी ९० लाख ९० हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ घेतला होता. कर्जवाटपाचे हे प्रमाण ३२.२६ टक्के एवढे होते. यंदा मात्र आतापर्यंत कर्जवाटपाच्या रकमेत २५१ कोटी २६ लाख ७६ हजार रुपयांची आणि कर्जाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत ३१ हजार १७२ ने वाढ झाली आहे. 

जिल्हा बॅंकेकडून दर वर्षी १ एप्रिलपासून खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू करण्यात येते. त्यानुसार यंदा खरीप हंगामासाठी एकूण १ हजार ६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आलेले आहे. गतवर्षीसुद्धा एवढेच उद्दिष्ट होते. शेतकऱ्यांनी फारसी मागणी न केल्याने यंदाही तेच उद्दिष्ट कायम ठेवले. जिल्ह्यात सर्वाधिक १३७ कोटी ६६ लाख ५० हजारांचे पीककर्ज जुन्नर तालुक्‍यात वाटप झाले आहे. सर्वांत कमी पाच कोटी १२ लाख ८४ हजार रुपयांचे कर्जवाटप वेल्हे तालुक्‍यात झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com