खेडच्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविणार - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

चाकण - खेड तालुक्‍यातील धरणग्रस्त व इतर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यात येणार आहेत. भामा-आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पुनर्वसनाचे शिक्के आहेत. रिलायन्स कंपनीच्या गॅस वाहिनीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना मोबदला व्यवस्थित मिळाला नाही. त्याप्रश्नी व पुनर्वसनाचे शिक्के काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भोसे (ता. खेड) येथे सांगितले.

भोसे येथील महादेवनगर गांडेकरवस्ती येथे रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते गजानन गांडेकर यांनी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात कृषी राज्यमंत्री खोत बोलत होते. ते म्हणाले, ‘‘किती शिकलो यापेक्षा काय शिकलात याला महत्त्व आहे.

शेतकऱ्यांचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या तालमीत आम्ही कार्यकर्ते घडलो आहोत. म्हणून राज्याचे मंत्रिपद आपल्या बळावर प्राप्त केले. महत्त्वाच्या खात्यांचा राज्यमंत्री म्हणून मी कारभार सांभाळत आहे. समाज व शेतकऱ्यांच्या हिताची कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. माझी शेतकरी व काळ्या मातीशी नाळ जोडली आहे.’’

या वेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिवनाथ जाधव, सीमा पवार, राधा शेलार, छाया सकट, सुधा झेंडे, गणेश चव्हाण, पूजा राजपूत, निर्मला राजपूत, शंकर लोखंडे, राहुल कांडगे, सागर भोसले, मनोहर दिवाणे, बाळासाहेब दौंडकर, सुभाष पवळे, रामचंद्र साबळे, वसंत लोणारी, चंद्रकांत लोणारी, किरण कुटे, बाबा हजारे, शरद देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन गांडेकर यांनी केले. आभार ज्ञानेश्वर रायकर यांनी मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khed Farmer Issue Sadabhau Khot