खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

खेड - शिवापूर - थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाण्यासाठी रविवारी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले, त्यामुळे रविवारी दिवसभर पुणे- सातारा रस्त्यावर रविवारी वाहतूक कोंडी झाली. त्यातच रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

पुणे- सातारा रस्त्यावर रविवारी सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी होती. त्यात सर्वांत जास्त संख्या लहान मोटारींची होती. साताऱ्याकडे जाणाऱ्या टोल नाक्‍यावर त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. टोल प्रशासनाने जागेवर जाऊन टोल देण्यासाठी मशिनची व्यवस्था केली होती. 

त्यातच वेळू फाट्यावर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. येथील सुमारे एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनांना सुमारे दहा मिनिटे वेळ लागत होता. 

लग्नसराई आणि कोंढणपूरच्या देवीची यात्रा सुरू असल्यामुळेही कोंढणपूर फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चेलाडी फाट्यावर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे याठिकाणीही वाहतूक कोंडी झाली होती. राजगडचे फौजदार आर. जी. राठोड, पोलिस हवालदार विकास कांबळे, बापू कदम, सतीश चव्हाण, दिलीप आंबेकर आणि वाहतूक वार्डन दिवसभर वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते.

रविवारी साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या ही रोज जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत सुमारे ३० टक्के जास्त होती. त्यातच सकाळच्या वेळी एकदम ही वाहनांची गर्दी वाढली होती. वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी टोल नाक्‍यावर जागेवर जाऊन टोल देणाऱ्या मशिनची संख्या वाढविण्यात आली होती.
- अमित भाटिया, पुणे- सातारा टोल रस्त्याचे व्यवस्थापक

Web Title: Khed Shivapur Toll Naka Traffic