अनगड बांध अन्‌ समतल चर

मित्रमंडळ चौक - ‘वनराई’तर्फे आयोजित प्रदर्शनाची पाहणी करताना विद्यार्थी.
मित्रमंडळ चौक - ‘वनराई’तर्फे आयोजित प्रदर्शनाची पाहणी करताना विद्यार्थी.

पुणे - अनगड दगडी बांध, सलग समतल चर, वनराई बंधारा, सामूहिक शेती, शेती अवजारे, अपारंपरिक ऊर्जा उपकरणे, घरगुती वापराच्या पर्यावरणपूरक वस्तू आदींचा समावेश असलेल्या ‘खेड्याकडे चला’ या प्रदर्शनास विद्यार्थी, नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. 

‘वनराई’च्या ३३व्या वर्धापन दिनानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्‍वत कृषी-ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या वनराईच्या वतीने राज्यभरात सुरू असलेल्या कार्याची ओळख या प्रदर्शनातून करून देण्यात आली. ग्रामीण विकास कसा साधला जाऊ शकतो, सामूहिक शेती, शेती अवजारे, शेतीपूरक व्यवसाय यांचे मार्गदर्शक, पाणलोट व्यवस्थापनाचे कार्य कसे राबविले जाते याची माहिती विद्यार्थ्यांसह नागरिकांना कळावी यासाठी डोगंराची प्रतिकृती तयार केली होती. त्यामध्ये अनगड दगडी बांध, सलग समतल चर, गॅबियन बंधारा, सिमेंट नाला बंधारा, वनराई बंधारा असे विविध बंधारे कशा पद्धतीत काम करतात, हे प्रदर्शनात दाखविण्यात आले होते.  

शहरातील विविध शाळांतील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रदर्शनाला भेट दिली. कृषी-ग्रामीण विकासाच्या  आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावे, या हेतूने या स्नेहमिलन आणि पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com