खो-खो खेळाडु बनली फौजदार

नवनाथ भेके
मंगळवार, 26 जून 2018

निरगुडसर(पुणे) - खो-खो खेळातुन मिळालेली एकाग्रता व जिद्द, चिकाटी पुढे कामी आली आणि पहिल्यापासुन अधिकारी बनन्याचे स्वप्न बाळगणा-या रांजणी (ता.आंबेगाव) येथील नरसिंह क्रिडा मंडळातील खो-खो खेळाडु पल्लवी गोविंद वाघ हीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उतीर्ण होऊन आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. रांजणी गावातून पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला. 

निरगुडसर(पुणे) - खो-खो खेळातुन मिळालेली एकाग्रता व जिद्द, चिकाटी पुढे कामी आली आणि पहिल्यापासुन अधिकारी बनन्याचे स्वप्न बाळगणा-या रांजणी (ता.आंबेगाव) येथील नरसिंह क्रिडा मंडळातील खो-खो खेळाडु पल्लवी गोविंद वाघ हीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उतीर्ण होऊन आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. रांजणी गावातून पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला. 

आंबेगाव तालुक्यातील रांजणी सारख्या खेड़ेगावात एका शेतकरी कुटुंबात पल्लवीचा जन्म झाला असुन प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी येथे झाले. तर माध्यमिक शिक्षणासाठी रयत शिक्षण संथेचे नरसिंह विद्यालय रांजणी येथे इ. पाचवीला प्रवेश घेऊन 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण अण्णा साहेब आवटे कॉलेज मंचर येथे पूर्ण करुन बी कॉम ची पदवी कॉलेजमधे प्रथम क्रमांक पटकावुन मिळवली. पदवी मिलावल्या नंतर पुढे काय करावे या विचारात असताना स्पर्धा परिक्षेबद्दल माहिती मिळाली व आपण अधिकारी बनण्याचे स्वप्न मनाशी घट्ट बांधले होते. यासाठी पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेची कसुन तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फ़त घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पी एस आय) परीक्षेत 225 गुण मिळवून खुल्या महिला गटात 14 वा क्रमांक पटकावला. 

नरसिंह विद्यालयात आवड म्हणून खेळालेल्या खो खो या खेळाचा उपयोग तिला पी एस आय पदासाठी द्यावी लागणारी शारीरिक क्षमता चाचणी मध्ये झाला तिला 100 पैकी 98 गुण मिळाले. या यशामधे सर्वात मोठे योगदान हे माझ्या आई वडिलांचे असुन शेतकरी कुटुंब, तुटपूंजी शेती, उपजीविकेसाठी संभाळलेल्या गायी. आर्थिक परिस्थिति बेताची असतानाही वडिलांनी शिक्षणासाठी कधीही मुलगी म्हणून बंधने घातली नाही. प्राथमिक शाळेत लाभलेल्या विद्या वाघ मॅडम. नरसिंह विद्यालयात लाभलेले संदीप चव्हाण सर, दत्ता येवले सर, यादव सर यांच्या मुळे शिक्षणाचा भक्कम पाया घडल्याचे पल्लवीने सांगितले. अधिकारी झालेली आपली सहकारी खो-खो खेळाडुला मैदानावर आल्यानंतर तिचे कौतुक करुन तिला सर्व खेळाडु व प्रशिक्षक संदीप चव्हाण यांनी पेढा भरवुन तिचे अभिनंदन केले आहे.

मैदानावरच्या लाल मातीने मला कणखर बनवले.....
पल्लवी वाघ म्हणाली की, खो खो खेळाची आवड संदीप चव्हाण सरांमुळे लागली इयत्ता सातवीत असताना सर्वोत्कृष्ट खो खो खेळाडू हा मिळालेला बहुमान मला आजही आठवतो. खो खो खेळामुळे प्रवास घडला. विविध ठिकाणी जाऊन स्पर्धा करता आल्या त्यामुळे शरीराची तसेच मनाचीही कणखरता वाढली.त्याचा उपयोग न कंटाळता जिद्दीने अभ्यास करण्यासाठी होऊन ख-या अर्थाने मैदानावरच्या लाल मातीने मला कणखर बनवले.

Web Title: The Kho-Kho player became a police