पुण्यात डांबून ठेवलेल्या इराणी तरुणीची सुटका

पांडूरंग सरोदे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे : मुंबईतील नामवंत उद्योजकाचा मुलगा आणि एका नामांकित अभिनेत्रीच्या भावाने एका इराणी तरुणीशी प्रेमसंबध निर्माण करुन तिला एक महिना घरात डांबुन ठेवत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याप्रकरणी तरुणास सोमवारी रात्री कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक करत तिची सुटका केली.

धनराज उर्फ बाबा मोरारजी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी इराणी विद्यार्थीनीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इराणी विद्यार्थीनी ही कम्प्यूटर सॉफ्टवेअर कोर्सचे शिक्षण घेण्यासाठी आली होती. एका मैत्रीणीच्या माध्यमातुन तिची मोरारजी याच्याशी ओळख झाली. संबंधित विद्यार्थीनीची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचा फायदा घेऊन मोरारजीने तिच्याशी ओळख वाढविली. तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. दरम्यान एक महिन्यापासुन त्याने तरुणीला त्याच्या कोरेगाव पार्क येथील सदनिकेमध्ये डांबून ठेवले. त्याने तिला सिगरेटचे चटके देणे, मारहाण केली. 

या प्रकाराबाबत तरुणीने तिच्या मैत्रीणीला माहिती दिली. त्यानंतर मैत्रीणीने कोरेगाव पार्क पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी मोरारजी याच्या सदनिकेत जाऊन तरुणीची सुटका केली.

तरुणीवर अत्याचार करणारा मोरारजी याचे वडील मुंबईतील नामवंत उद्योजक आहेत. तसेच अभिनेत्री व राजकारणी नगमा यांचा भाऊ असल्याचे आरोपीने सांगितले आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थिती भक्कम असल्यामुळे त्याच्याकडुन तरुणीला पैशाचे आमिष दाखवुन या स्वरुपाचा गुन्हा केला जात असल्याची माहिती बहाददरपूरे यांनी सांगितले

"इराणी तरुणी व मोरारजी नावाच्या तरुणाचे प्रेमसंबंध होते.त्याने तिला आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवुन घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. तरुणीची सुटका करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे."
- मदन बहाद्दरपूरे, पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे.

Web Title: kidnapped Irani Girl released in Pune