उसने पैसे परत घेण्यासाठी तिघांकडून मुलाचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

येरवडा - व्यवसायासाठी दिलेले दोन लाख रुपये परत मिळविण्यासाठी तिघांनी चक्क सतरा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले होते. येरवडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत अपहरण केलेल्या मुलाची सुटका करून आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. 

येरवडा - व्यवसायासाठी दिलेले दोन लाख रुपये परत मिळविण्यासाठी तिघांनी चक्क सतरा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले होते. येरवडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत अपहरण केलेल्या मुलाची सुटका करून आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. 

फिर्यादी किसन धोंडिबा जाधव (वय ५०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, येरवडा) यांचा टीव्ही खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी संशयित आरोपी विशाल दत्तात्रय ढोले (वय २८, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याचा भाऊ निखिल ढोले यांच्याकडून दोन लाख रुपये उसने घेतले होते. मात्र व्यवसायात तोटा झाल्यामुळे जाधव यांनी पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली होती. त्यामुळे विशाल ढोले याच्यासह स्वप्निल शांताराम तांबे (वय २८, रा. गणेगाव वरुडे, ता. शिरूर) व सचिन बंडू थिटे (वय ३२, रा. सणसवाडी) या तिघांनी मंगळवारी रात्री जाधव यांच्या पुतण्याचे अपहरण केले. 

याची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, सहायक पोलिस हवालदार बाळासाहेब बहिरट, पोलिस हवालदार हरिश्‍चंद्र मोरे, हनुमंत जाधव, समिर भोरडे, नागेश कुवर, मनोज कुदळे आणि अशोक गवळी यांनी आरोपींच्या काही तासांतच मुसक्‍या आवळून अपहरण केलेल्या मुलाची सुटका केली.

Web Title: kidnapping crime