सावधान! पुण्यात पोलिसांचंच होतंय अपहरण!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

पुणे : पुण्यात पैशांसाठी किंवा इतक कारणांसाठी गुन्हेगार, खंडणीबहाद्दर सर्वसामान्य नागरिकांचे अपहरण करण्याचे प्रकार होत असतात. परंतु ठराविक काळानंतर पोलिसांपुढे त्यांची डाळ शिजत नाही. पण, रविवारी रात्री पुण्यात चक्क पोलिसाचेच अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कारला नंबर प्लेट न लावल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे तिघांनी अपहरण केले. 

पुणे : पुण्यात पैशांसाठी किंवा इतक कारणांसाठी गुन्हेगार, खंडणीबहाद्दर सर्वसामान्य नागरिकांचे अपहरण करण्याचे प्रकार होत असतात. परंतु ठराविक काळानंतर पोलिसांपुढे त्यांची डाळ शिजत नाही. पण, रविवारी रात्री पुण्यात चक्क पोलिसाचेच अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कारला नंबर प्लेट न लावल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे तिघांनी अपहरण केले. 

एवढेच नाही, तर पोलिसाला शिवीगाळ, मारहाण करुन 20-25 किलोमीटर दूर परिसरात सोडून दिले. ही घटना रविवारी रात्री पावणे नऊ वाजता सिंहगड रोड परिसरात घडली. याप्रकरणी सचिन रानवडे, मयुर मते व त्यांचा एकसाथीदार अशा तिघांविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस कर्मचारी सचिन सर्जेराव तनपुरे (वय 35, रा. सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तनपुरे हे सिंहगड पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तनपुरे व त्यांचा सहकारी शिंदे असे दोन्ही बीट मार्शल रात्रगस्तीवर होते. त्यावेळी सिंहगड रस्त्यावरील हॉटेल निखारासमोर पाठीमागे नंबर प्लेट नसलेल्या कारबाबत तनपुरे व त्यांच्या सहकाऱ्यास संशय आला. कारचा दरवाजा उघडल्यानंतर रानवडे, मते व त्यांच्या एक साथीदार असे तिघेजण मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले.

तनपुरे यांनी त्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी रानवडेने तनपुरे यांना शिवीगाळ केली, तर शिंदे यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे तनुपरे यांनी त्यांच्या कारमध्ये बसून त्यांना अभिरुची पोलिस चौकीमध्ये गाडी नेण्यास सांगितले. त्यावेळी कार चालविणाऱ्या रानवडेने कार अभिरुची पोलिस चौकीकडे न घेता प्रयेजा सिटीकडून मुंबई-बंगळुरू महामार्गावर कार घेतली. त्यानंतर फिर्यादी तनपुरे यांना शिवीगाळ व मारहाण करुन उड्डाणपुलावरुन खाली टाकून देण्याची धमकी दिली. रानवडे याने फिर्यादीकडील वॉकीटॉकी व मोबाईल काढून घेतला. त्याचवेळी मते याने रानवडे फिर्यादीस शिवीगाळ, मारहाण करीत असताना मोबाईलवर व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर फिर्यादी यांना जबरदस्तीने बावधन येथे नेऊन रस्त्यावर सोडून देत पलायन केले. त्यानंतर फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping of police in Pune