उन्हामुळे वाढले किडनीचे रुग्ण

Kidney
Kidney

पुणे - पुण्यातील यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे किडनी (मूत्रपिंड) आणि मूत्रविकाराच्या त्रासाचे रुग्ण वाढल्याची माहिती मूत्रपिंडविकार तज्ज्ञांनी नोंदविली. सामान्य नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, तर किडनीविकार असणाऱ्यांनी शरीर गार ठेवण्याचे उपाय योजावे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

उन्हाळ्यात कामाच्या गडबडीत आपण पुरेशा प्रमाणात पाणी पीत नाही. त्यातून ‘क्रॉनिक किडनी डियाड्रेशन’ होते. त्यातून किडनीच्या पेशींना कमी पाण्याची सवय होते. त्यातून या काळात मूतखड्याच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. शरीरात पाणी कमी गेल्याने लघवीचे प्रमाण कमी होते. त्यातून मूतखडा अडकून तीव्र वेदना होतात. उन्हाळ्याच्या काळात या वेदना रुग्णासाठी जीवघेण्या असतात. कारण किडनीतील पाण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असते, अशी माहिती मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘मूत्रमार्गावर सूज येते. त्याला उन्हाळी लागणे असे सामान्यतः म्हटले जाते. त्याचे प्रमाण वाढते. त्यातून रुग्णाला आग, जळजळ, लघवीतून रक्त जाणे असे प्रकार होतात. हा उन्हाळा जास्त तीव्र असल्याने या रुग्णांचे प्रमाण जास्त दिसून येते.’’ 

मूत्रपिंडविकास तज्ज्ञ डॉ. अभय सदरे म्हणाले, ‘‘जास्त उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यातून लघवी कमी होणे, पिवसळसर होणे, न होणे असे होण्याचा धोका असतो; पण सगळ्यात काळजी ही किडनीचा विकार असलेल्या रुग्णांनी घेणे आवश्‍यक असते. कारण त्यांना पाणी कमी प्यायचे असते. जास्त पाणी प्यायल्यास ते त्यांच्या शरीरात साठून राहते. पण उन्हाळ्यात तहान तर लागलेली असते. त्यामुळे या रुग्णांची अडचण होते. अशा काही रुग्णांमध्ये क्रियेटिन वाढण्याची शक्‍यता असते. त्यातून गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी रुग्णाने थंड ठिकाणी बसून राहणे, फ्रिजमधील बाटलीच्या पाण्याने चूळ भरणे, तोंडावर ओला टॉवेल घेणे असे उपाय करावे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com