मुतखड्याच्या औषधांसाठी पाटणकर यांना पेटंट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुणे : शहरातील मूत्रपिंड विकारतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांना अमेरिकेचे दुसरे बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मिळाले आहेत. मुतखडा आणि मूत्र मार्गातील अन्य विकारांवरील आयुर्वेदिक औषधे आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या निकषासाठी हे पेटंट मिळाले आहे. 

डॉ. पाटणकर यांनी पेटंटसाठी मार्च 2012 मध्ये अर्ज केला होता. त्यांना गेल्या दोन वर्षांमध्ये मिळालेले हे अमेरिकेचे दुसरे पेटंट आहे. डॉ. पाटणकर म्हणाले, ""तोंडावाटे दिले जाणारे हे औषध मुतखडा व मूत्र मार्गातील विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी पूरक उपचार म्हणून काम करते. ज्या रुग्णांमध्ये तीन ते चार मिलि मीटर आकारातील मुतखडा आढळून येतो, त्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध नसतो. मूत्र मार्गाद्वारे खडा बाहेर काढणे व वेदनांपासून मुक्तता मिळण्यासाठी हे औषध फायदेशीर ठरू शकते. शस्त्रक्रियेनंतर राहिलेले छोटे कण व त्यामुळे होणारा त्रास आणि पुन्हा हे खडे तयार होऊ नयेत, यासाठीदेखील या औषधाचा उपयोग होणार आहे.'' 
 
Web Title: kidney stone patent to patankar

टॅग्स