बच्चे कंपनीसाठी धम्माल वर्कशॉप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत पालकांना येणारे टेन्शन भुर्रकन उडवून लावणाऱ्या आणि सुटीची धमाल घडविणाऱ्या ‘किड्‌स कार्निव्हल’मधील मुलांचा सहभाग नक्कीच कल्पक ठरणार आहे. शिक्षणातून खेळ व खेळातून आनंद घेता यावा म्हणून मुलांसाठी खास वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

मुलांच्या क्रिएटीव्हिटीला वाव देणारा हा भन्नाट कार्निव्हल येत्या शुक्रवारी (ता. १८) आणि शनिवारी (ता. १९) व पुढील शुक्रवारी (ता. २५) होत आहे. यात मुलांना पेपर क्राफ्ट, पेपर क्विलिंग, फ्रिज मॅग्नेट, हिप पॉप डान्स यांसारख्या कार्यशाळांची मेजवानी मिळणार आहे. या कार्यशाळांसाठीचे सर्व साहित्य मिळणार असून, स्वत: तयार केलेल्या वस्तू मुलांना घरी घेऊन जाता येतील. या कार्यशाळा मोफत असून, त्यासाठी जवळच्या पुणे सेंट्रल मॉलमध्ये दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी मर्यादित जागा आहेत.

Web Title: kids carnival for child