नाताळनिमित्त ‘किड्‌स आयडॉल’

Young-Buzz
Young-Buzz

तीन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ऑनलाइन सोलो नृत्य स्पर्धा
पुणे - लहानपणापासूनच मुलांना चित्रपटातील गाणी व नृत्याचे आकर्षण असते. टीव्हीवर लागणाऱ्या गाण्यांवर त्यांचे पाय थिरकतात. तुमच्या मुलांमधील या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. गेली ११ वर्षे ‘किड्‌स आयडॉल’ हा उपक्रम ‘यंग बझ’तर्फे राबविला जात आहे. तीन ते सोळा वयोगटातील नर्सरी ते दहावीपर्यंतच्या मुला-मुलींसाठी होणारी ‘किड्‌स आयडॉल २०२०’ ही ऑनलाइन सोलो नृत्य स्पर्धा असेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वयोगटानुसार ऑनलाइन सोलो नृत्य स्पर्धा ‘अ’ ते ‘ड’ या गटांत विभागण्यात आली आहे. ‘अ’ गटात नर्सरी ते सीनिअर केजी, ‘ब’ गटात पहिली ते तिसरी, ‘क’ गटात चौथी ते सहावी आणि ‘ड’ गटात सातवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. स्पर्धेत ‘आयटम साँग्स’ ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेचे ऑनलाइन स्वरूप -
खालील क्‍यूआर कोड स्कॅन करून स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरावे आणि वरील व्हाॅट्‌सॲप नंबरवर प्रवेश शुल्क भरल्याची पावती स्पर्धकाचे नाव, वय, इयत्ता, मोबाईल नंबर व ई-मेल आयडीसहित पाठवावी.

स्पर्धेसाठी नावनोंदणी - १ ते १० डिसेंबर २०२०
ऑनलाइन सोलो नृत्य स्पर्धा - २५० रुपये शुल्क
अधिक माहितीसाठी संपर्क - ८८०५००९३९५, ९५५२५३३७१३, ९३५६८९५१८६

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com