नृत्याने रंगली अंतिम फेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे - मुले व पालकांची गर्दी, फॅन्सी ड्रेससाठी झाड, नारळ, वडापाव, व्हॉट्‌सॲप, सूर्य अशा अफलातून वेशभूषेत तयार झालेल्या मुलांमुळे एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला. निमित्त होते ‘किड्‌स आयडॉल’च्या अंतिम फेरीचे. ‘सकाळ यंग बझ’तर्फे अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍समध्ये नाताळनिमित्त (ता. २५) हा अंतिम सोहळा पार पडला. 

आपल्या पाल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पालकांनी ‘किड्‌स आयडॉल’मध्ये सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. वयोगटानुसार जॅज, हिपॉप, क्‍लासिकल, कॉन्टेम्पररी अशा विविध नृत्य प्रकारांवर मुलांनी एकापेक्षा एक नृत्ये सादर केली. नृत्य विभागात ‘अ’ ते ‘क’ गटात एकूण २१ विजेते व फॅन्सी ड्रेस विभागात ‘अ’ व ‘ब’ गटात १५ विजेते घोषित करण्यात आले. सर्व विभागांतून उत्कृष्ट सादरीकरणासाठी अपेक्षा लोंढे हिला चिजीयानो फूड्‌स इंडिया प्रा. लि.तर्फे स्पोर्टस सायकल भेट देण्यात आली. गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला मुले व पालक दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. पालकांनीही मुलांसोबत डान्स करण्याची इच्छा ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍सचे संचालक सुनील भिडे व यशोधन भिडे, न्यू एरा ॲकेडमी - संस्कृती नॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्याध्यापक समीर शेख, चिजीयानो फूडस्‌ इंडिया प्रा. लि.चे सहसंस्थापक आणि संचालक सचिन तिळवे आणि सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रसाद तिळवे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे नृत्य परीक्षण नृत्य दिग्दर्शक मृदंग देसाई व श्‍वेता फर्नांडिस यांनी केले.

Web Title: Kids Idol Dance Competition