आठशे रूपयांसाठी केला मित्राचा खून

संदीप घिसे 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) : उसने घेतलेले पैसे तसेच मोबाइलचे मेमरी कार्ड परत न दिल्याने मित्राचा खून केल्याची घटना रहाटणी येथे घडली. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी वाकड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पिंपरी (पुणे) : उसने घेतलेले पैसे तसेच मोबाइलचे मेमरी कार्ड परत न दिल्याने मित्राचा खून केल्याची घटना रहाटणी येथे घडली. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी वाकड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

अनिल श्रावण मोरे (वय 39, रा. सायली पार्क, भैय्या चाळ, रहाटणी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पवन उर्फ अनिल रमेश सुतार-हिरे (वय 39, मुळगाव चिंबळी ता. खेड जि. पुणे) असे खून झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी मधील कुणाल हॉटेलच्या पाठीमागील बाजूस 16 जुलैला सकाळी सुतार याचा खून झाल्याचे उघडकीस आले. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये त्याचा मित्र अनिल मोरे हा मोबाईल बंद करून कुठेतरी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. पोलीस हवालदार दादा पवार व धनराज किरणाने यांना संशयित आरोपी अनिल मोरे हा बावधन येथे एका ठिकाणी सुतारकाम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने पटाशीच्या साहाय्याने खून केल्याची कबुली दिली.

आरोपी मोरे याने मयत पवन सुतार यांना आठशे रुपये उधार दिले होते. तसेच मोरे यांचे मोबाईलचे मेमरीकार्ड सुतार यांनी परत दिले नाही याचाही राग मनात धरून आरोपीने तब्बल 34 वार करत खून केला. सहाय्यक आयुक्त सतीश पाटील, श्रीधर जाधव, वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी दादा पवार, धनराज किरनाळे, सुरेश भोसले, शाम बाबा, बिभीषण कणेरकर, हनुमंत राजगे, मनोज बनसोडे, अशोक दुधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, दत्तात्रय इंगळे, विक्रांत गायकवाड, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, मंहमदगौस नदाफ, राजेंद्र बारशिंगे, भैरोबा यादव, गणेश गिरीगोसावी, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, बापू गायकवाड, राजू जाधव व सागर सुर्यवंशी यांच्या पथकांनी ही कामगिरी केली.

Web Title: killed a friend for 800 rupees