महाराष्ट्रात रावण मुख्यमंत्री पदावर बसले आहेत

किरीट सोमय्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Kirit somaya
Kirit somayaSakal

विश्रांतवाडी - रावणाची लंका हनुमानाने जाळली असल्यामुळे हनुमानाची सर्वात जास्त भिती रावणाला होती. महाराष्ट्रात रावण मुख्यमंत्री होऊन बसले असल्यामुळे त्यांना हनुमान चालीसा म्हणणा-यांची भीती वाटत असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचे काम ठाकरे- पवार सरकार करत असून महाराष्ट्रातील जनताच आता सरकारची लंका जाळणार असल्याचा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला.

लोहगाव येथील भाजपचे माजी उपसरपंच सुनील खांदवे-मास्तर यांनी वारकऱ्यांसाठी रेनकोट, तंबूचे वाटप तसेच विविध कोर्सचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी किरीट सोमय्या बोलत होते. कार्यक्रमास भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पंकज गावडे महाराज, राहूल भंडारे, मुक्ता जगताप, संतोष खांदवे, दिपक खांदवे, मोहन शिंदे, अँड आदित्य खांदवे, स्वप्निल उन्द्रे, संदिप मोझे, संतोष खांदवे, रावसाहेब राखपसरे, सुधीर गलांडे, दिलीप रखपसारे, यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

किरीट सोमय्या बोलताना म्हणाले, हनुमान चालीसा म्हणणारा जेलमध्ये जातो आणि दाऊदचा हस्तक मात्र मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो. मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व गहाण ठेवले असून सचिन वाजे हा माफीचा साक्षीदार झाल्यामुळे आता अनिल परब यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचेदेखील नाव वसुली प्रकरणात येऊ शकते. त्यामुळे त्यांना भिती वाटत आहे.

मंत्रिमंडळातील सर्व मंत्री भ्रष्टाचारी असून कोवीड सेंटरमध्ये देखील यांनी प्रचंड घोटाळा केला असल्याचा आरोप केला. आपल्याला कितीही गुंड पाठवून मारण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील हे माफिया लुटारूंचे सरकार घालवल्या शिवाय आपण गप्प बसणार नसल्याचे असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष मुळीक यांनी आपल्या भाषणात मोदी सरकार संस्कृती रक्षणाचे काम करीत असल्याचे मत मुळीक यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोझे व संतोष खांदवे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com