कशासाठी, पोटासाठी...चिमुकलीची तारेवरची कसरत

किरकटवाडी - कसरत करताना संजना व तिचे कुटुंब.
किरकटवाडी - कसरत करताना संजना व तिचे कुटुंब.

किरकटवाडी - ऑक्‍टोबर महिन्यातील चटकणारे सकाळचे ऊन, जुन्या हिंदी गाण्यांचा भावपूर्ण नाद आणि दोरीवर तोल सांभाळणारे चिमुकले पाय हे चित्र होते सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या कोल्हेवाडी फाट्यावरील.

पोटाची खळगी भरण्यासाठी दोरीवर तोल सांभाळणारी अवघ्या सहा वर्षांची चिमुकली संजना, कानाने पूर्ण बहिरे असणारे तिचे वडील सोनूनाथ व दोरी धरून बसलेली संजनाची आई सरोजनी असं हे रस्त्यावर पोट भरणारं कुटुंब. पाटी-पेन्सिल घेऊन अक्षरं गिरवण्याच्या व हातात बाहुली घेऊन खेळायच्या वयात या चिमुकलीला आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी दोरीवर कसरत करावी लागत आहे. उपस्थितांकडून त्या वेळची क्षणिक संवेदना दाखवली जाते. कोणी पाच रुपये, कोणी दहा रुपये तर कोणी पन्नासची नोट तिच्या हातात देतो. 

छत्तीसगड वरून आलेलं हे कुटुंब गावोगावी फिरून आपलं पोट भरत आहे. असे कित्येक परिवार रस्त्यावर फिरून आपले पोट भरत आहेत. त्यांच्याबरोबर असलेल्या चिमुकल्यांचं बालपण या रस्त्यावरच हरवून जात आहे.

आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, सुधारणा या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी यांच्यासाठी मात्र पोटाचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com