भन्नाट! कीर्तनाची गोडी इंग्रजीतून; वारकरी सांप्रदायाची महती पोहोचवणार परदेशात

भन्नाट! कीर्तनाची गोडी इंग्रजीतून; वारकरी सांप्रदायाची महती पोहोचवणार परदेशात
-
Summary

कीर्तन ऐकलं नाही असा एखादा माणूस क्वचितच महाराष्ट्रात सापडेल. मात्र इंग्रजी भाषेत कीर्तन होतं असं म्हटलं तरी भुवया उंचावतील.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचं मोठं योगदान आहे. कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदयाने समाजाला नेहमीच दिशा दाखवण्याचे काम केले आहे. त्यातच आता बदलत्या काळानुसार वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधनासाठी आधुनिक मार्ग स्वीकारल्याचे पाहायला मिळते आहे. बाभळेश्वर येथील कीर्तन शिकणाऱ्या तरुणाने थेट इंग्रजीत कीर्तन करायला सुरुवात केली आहे.

कीर्तन ऐकलं नाही असा एखादा माणूस क्वचितच महाराष्ट्रात सापडेल. मात्र इंग्रजी भाषेत कीर्तन होतं असं म्हटलं तरी भुवया उंचावतील. आता इंग्रजीतूनही कीर्तन होत आहे. वारकरी संप्रदायाच्या या चळवळीत इंग्रजी भाषेत कीर्तन करणारे कीर्तनकार देखील तयार झाल्याचे पाहायला मिळतेय. शिर्डीच्या बाभळेश्वर येथील सद्गुरु नारायनगिरीजी गुरुकुलात वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे प्रमोद महाराज डुकरे आणि राम महाराज शिंदे हे दोन्हीही विद्यार्थी थेट इंग्रजीत कीर्तन करतात. त्यामुळे आता वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनाची चळवळ आता केवळ महाराष्ट्रात आणि देशातच नाही तर जगभरात पसरणार आहे.

भन्नाट! कीर्तनाची गोडी इंग्रजीतून; वारकरी सांप्रदायाची महती पोहोचवणार परदेशात
रा. रं. बोराडे : एक नातं, समजण्यापलीकडचे

वारकरी सांप्रदायाचे शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला मराठीत किर्तन करणाऱ्या या विद्यार्थ्यांना नंतर इंग्रजी भाषेत किर्तन करण्याचे शिक्षण मिळाले. मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पुर्ण केलेले मूळ नेवासा येथील रहिवासी असलेले ह.भ.प राम महाराज शिंदे आणि वैजापुर येथील रहिवासी असलेले प्रमोद महाराज डुकरे हे आज अस्खलीत इंग्रजीत किर्तन करता आहेत. याविषयी बोलताना 'संत नामदेव महाराजांनी जशी वारकरी सांप्रदायाची महती पंजाब पर्यंत पोहोचवली, ती आम्हाला आता जगभरात पोहोचवायची असल्याचे' हे विद्यार्थी सांगतात.

भन्नाट! कीर्तनाची गोडी इंग्रजीतून; वारकरी सांप्रदायाची महती पोहोचवणार परदेशात
आधुनिक हिरकणी! बाळाला पाठीशी बांधून गावोगाव करते लसीकरण

जगभरातील वेगवेगळ्या प्रकारचे उत्तमोत्त साहित्य इंग्रजी भाषेत असून, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त भाषा म्हणुन इंग्रजीकडे पाहिले जाते. त्यामुळे वारकरी सांप्रदयातील अध्यात्मीक साहित्य आता जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करु शकणार आहे. "केवळ भाषेच्या बंधनात अडकून न राहता वारकरी सांप्रदायाची महती सातासमुद्रापार जावी यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून किर्तन करण्याचे शिक्षण देत आहोत असे सदगुरु नारायणगिरीजी गुरुकूलाचे संस्थापक ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के यांनी सांगितले. तर आजचा काळ हा विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा असुन, आपल्याला वारकरी सांप्रदायाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे झाल्यास अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालावी लागणार असल्याचे मत गुरुकुलाचे अध्यक्ष भगवान महाराज डमाळे यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com